कंगनाची गोची…खाल्ली कानशिलात
आता तरी सुधरा रे!
चंदीगढ: आज चंदीगड एअरपोर्ट वर एका CISF च्या महिला अधिकाऱ्याने कंगणाच्या कानाखाली हाणली. ती महिला अधिकारी सैन्यात आहे. कृषी कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांबद्दल अतिशय खालच्या पातळीची भाषा कंगना ने वापरली होती. योगायोगाने त्या CISF च्या महिला अधिकाऱ्याची आई सुद्धा त्या आंदोलनाचा भाग होती आणि त्यामुळे कंगनाच्या वक्तव्याचा राग तिच्या मनात होता.
आता समजा जर ती महिला सैन्यात नसती तर कंगनाने आणि भक्त समुदायाने लगेच तिला खलिस्तानी घोषित केले असते. पण ती सैन्यात आहे आणि देशसेवा करते आणि तरीही तिचा परिवार कृषी कायद्याविरोधातील आंदोलनात सहभागी होता. त्यामुळे कंगनाची गोची झालेली आहे. पण त्या आंदोलनाला नाव ठेवणाऱ्या प्रत्येकाची सुद्धा ती झालेली आहे.
सरकारची हुजुरेगिरी करताना आपण आपली पातळी, विवेक आणि समज सगळंच विसरुन जातोय हे कित्येकांना तेव्हा लक्षातही येत नव्हतं. पण त्यांच्या त्या अतिहुशारीमुळे स्वतःच्या हक्क अधिकारांची मागणी करणे देशद्रोह आहे असा समज लोकांमध्ये पेरला गेला. आणि पूर्णतः अनैतिक, आणि सामान्यांना नुकसानदायक निर्णय घेण्याची मुभा सरकारला मिळाली.

