0
4
8
2
9
3
या सांजवेळी
कामावरून येण्याची वाट किती पाहू
चल ना थोडस घराबाहेर जावू
वाट बघतो चिमुकला तुझी
झाली बघ तयारी माझी!!१!!
सांजवेळी सखया फेरफटका मारू
तुझया साठी सांग शिणगार काय करू
नुकतीच जाहले आई मी आण तू वडील
बाळ आहे तुझ्यासारख खोडेल!!२!!
रंग माझा आणि चेहरा तुझा
राघव माझा बाळ राजा
संसाराच्या वेलीवर खुलले फुल
तीन दगडाची झाली चूल!!३!!
चल जावू सागराची गाज ऐकू
राघव ला ही सांजवेळ दाखवू
सावली तुझी माझी आज एक झाली
सांज बघ सूर्याच्या किरणांनी नहाली !!४!!
छोट्या छोट्या आनंदाचा
उपभोग घेऊ नव्या नवलाईचा
तू विठ्ठल मी तुझी रखुमाई
दुधापेक्षा जपते दुधावरली साई!!५!!
सुरेखा चित्ते
श्रीवर्धन, जि.रायगड
=========
0
4
8
2
9
3



