Breaking
ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

ती

वसुधा वैभव नाईक धनकवडी,जिल्हा - पुणे

0 5 1 7 8 7

ती

ती आहे एक जीवन प्रवाह
संकटांना चुकवत पुढे जाणारी
आपला मार्ग आपणच काढणारी…

ती आहे एक ठिणगी
अंधाराच्या छातीवर नाचणारी
प्रकाशाचे किरण जीवनात आणणारी ….

ती आहे एक परंपरा
अश्रुंना लपवून कायम हसणारी
वादळातही खंबीरपणे उभी राहणारी…

ती आहे एक सावित्री
ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणारी
कुटुंबातही सर्वांना सांभाळून घेणारी…

ती आहे एक लढाऊ जिजाऊ शौर्याच्या
कथा मुलांना कथन करणारी
मुलांच्या संस्कारांना खत पाणी घालणारी….

ती आहे सृष्टीचा महान मान
तिच्यामुळे मानव जातीची उत्पत्ती होते
सर्व ठिकाणी समानतेचा दीप उजळवते…..

आजच्या महिला दिनानिमित्त नको तिला फुलांचा वर्षाव. हवा तिला निर्भय आणि मोकळा श्वास. स्वतः पुरता थोडासा वेळ हवा. कारण ती फक्त ती नाही, तर कोणाचे तरी माता आहे भगिनी आहे. भार्या आहे, काकी, मामी, सखी आहे. ती भविष्याची शिल्पकार आहे शिल्प बनवण्याचे स्वातंत्र्य तिच्याकडून हिरावून घेऊ नका इतकेच सांगते.

स्त्रीचा सन्मान देशाचा अभिमान
स्त्री हीच तिची ओळख आहे महान…

वसुधा वैभव नाईक
धनकवडी,जिल्हा – पुणे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे