0
4
8
2
9
3
झिजलेला देह
कबाड कष्ट करून
थकले रे मी आता
आहे झिजलेला देह
माझा आहे विधाता
उणिवा सा-या गोष्टी
नाही होणार पुर्ण
स्वप्न पाहणे सोडले
नाही फुलणार स्वर्ण
तारूण्यात जे मिळाले
ते ठेवले मी जपून
नाही केले मी खर्च
सांगत आहे हृदयातून
पुर्ण केल्या सर्व इच्छा
पालन पोषण केले सर्वांचे
विचाराने वागले सर्वांशी
फुवविले कमळ जिवनाचे
आता काय करू मी
आयुष्य संपत चगलला
आहे झिजलेला देह माझा
आधार द्या हो मला
तारूण्यात जे कमावलेत
त्याने उंच शिखर गाठले
आता पाळी आहे तुंमची
जिवन व्यथीत करण्याची
केवलचंद शहारे
सौंदड गोंदिया
========
0
4
8
2
9
3



