Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रराजकियविदर्भ

‘गरजूंना लाभ मिळावा हाच आरोग्य शिबिराचा उद्देश’; माजी आ. राजू पारवे

बिनधास्त न्यूज प्रतिनिधी, अखिलेश रोडे

0 4 8 2 9 0

‘गरजूंना लाभ मिळावा हाच आरोग्य शिबिराचा उद्देश’; माजी आ. राजू पारवे

मुलांनो, राजू पारवे तुमचा काका म्हणून तुमच्या अडचणीत खंबीरपणे पाठीशी

बिनधास्त न्यूज प्रतिनिधी, अखिलेश रोडे

नागपूर /कुही (दि. २१) : गरीबी फार वाईट असते, आपण स्वतः गरिबी अनुभवल्याने सर्व परिस्थितीची जाणीव आपल्याला आहे. असे अनेक गरीब लोक असतात ज्यांना पैशाअभावी उपचार घेता येत नाहीत. अशा गरजू रुग्णांना मोफत लाभ मिळावा हाच आरोग्य शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन माजी आ. राजू पारवे यांनी केले. तितुर येथील आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

शनिवारी (दि.२१) राजूभाऊ पारवे जनसेवा प्रतिष्ठानच्यावतीने तितुर येथे महाआरोग्य शिबीर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन माजी आ. राजू भाऊ पारवे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवाजी सोनसरे माजी जि. प. सदस्य, रुपाली लांडगे, सरपंच तितूर, सतीश कांबळे उपसरपंच तितूर, ईश्वर ठाकरे, हरीश कडव, क्रिष्णाजी शहाणे पोलीस पाटील तितूर, अमोल सातव ग्रा. पं. सदस्य, नितीन कानफाडे ग्रा. पं. सदस्य, अमित लांडगे ग्रा. पं. सदस्य, हुकूमचंद लांबाडे, गणेश झंझाड आदींची यावेळी विचारमंचावर मुख्य उपस्थिती होती.

दरम्यान आरोग्य शिबिरात शेकडो रुग्णांची तपासणी करून मोफत उपचार करण्यात आले. नेत्र तपासणी, रक्त तपासणी, इसिजी यासह इतर मोफत सेवांचा लाभ नागरिकांनी घेतला. शेकडो रुग्णांना यावेळी मोफत चष्मे देण्यात आले. या आरोग्य शिबिरात युवकांनी रक्तदानही केले.
उपस्थितांशी संवाद साधताना राजूभाऊ पारवे म्हणाले की आपल्या लोकांचा खऱ्या अर्थाने कसा विकास होईल एवढया एकाच गोष्टीचा आपण ध्यास घेतला आहे. पद गेल्यामुळे आपण जराही स्वस्थ बसलो नाही. विकास कामांना गती देण्यासाठी सतत धावपळ सुरू असल्याचे सांगून कुही तालुक्यात तब्बल १२०० शे एकरवर एमआयडीसी व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. एक एका कार्यालयात किती तरी खेटे घालत आलो आहे. पण आता लवकरच नव्या एमआयडीसी प्रकल्पाला मंजुरी मिळेल अशी माहिती श्री. पारवे यांनी दिली.

तसेच २५० कोटी रुपयांच्या अंभोरा प्रकल्पाचे वर्क आऊटही झालेले असल्याची माहिती देत या प्रकल्पामुळे आपण जगाच्या नकाशावर जाणार असून या प्रकल्पामुळे तरुणांच्या हाताला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असल्याचेही राजू भाऊ यांनी म्हटले. गावासाठी योगदान देणारे पोलीस पाटील व जोखीम घेऊन सेवा करणारे वीज कर्मचारी यांच्याबद्दल राजूभाऊंनी याप्रसंगी कृतज्ञता व्यक्त केली. राजू भाऊंच्या हस्ते मोमेंटो व गिफ्ट देऊन सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. गरजू विद्यार्थ्यांनी कसल्याही प्रकारची अडचण आल्यास हक्काने यावे. हा राजू पारवे तुमचा काका म्हणून तुमच्या अडचणीत खंबीरपणे पाठीशी उभा राहील असा शब्द राजू पारवे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

दरम्यान समाज कल्याण विभागाचे अधिकारी राजेंद्र अवदुत व योगेश पडाळे यांनी अनेक योजनांची सविस्तर माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले. लाडकी बहिण सह इतर योजनांसाठी नाव नोंदणी करण्याकरिता यावेळी मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज करनुके यांनी केले. यावेळी शिबिरार्थिंसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे