Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगोंदियानागपूरमहाराष्ट्रविदर्भ

कॅरमच्या पटावर न्यु मून ज्युनिअर कॉलेजचा दमदार डाव; जयंत- मोसमची जिल्हास्तरावर झेप!

तारका रूखमोडे, प्रतिनिधी

0 6 1 1 7 0

कॅरमच्या पटावर न्यु मून ज्युनिअर कॉलेजचा दमदार डाव; जयंत- मोसमची जिल्हास्तरावर झेप!

तारका रूखमोडे, प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज मिडीया

अर्जुनी/मोर: तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत न्यु मून सायन्स ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याची चमक दाखवत उल्लेखनीय यश संपादन केले. इयत्ता १२ वीतील जयंत मेंढे आणि मोसम मेश्राम यांनी कॅरमच्या पटावर अचूक निशाणा साधत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आणि स्पर्धेत विजय मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.

एकाग्रता, संयम आणि अचूक स्ट्राईकच्या जोरावर दोन्ही खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांना दमदार टक्कर देत हा विजय संपादन केला. त्यांच्या या शानदार कामगिरीमुळे न्यु मून ज्युनिअर कॉलेजच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ही तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी जी.एम.बी. हायस्कूल या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.

या उल्लेखनीय यशाबद्दल प्रा.तारका रुखमोडे व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका प्रतीक्षा राऊत यांनी जयंत मेंढे व मोसम मेश्राम यांचे महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 1 1 7 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे