Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणे

रात्र शाळेतील मुलांना बालगीतांची मेजवानी

0 4 8 2 9 7

रात्र शाळेतील मुलांना बालगीतांची मेजवानी

वसुधा वैभव नाईक,पुणे प्रतिनिधी

पुणे: काव्ययोग काव्य संस्था पुणे आयोजित “बालगीत कार्यशाळेचे आयोजन केले होते. हे आयोजन अश्विनी फुटपाथ रात्र शाळा कात्रज येथे करण्यात आले होते. त्यात मार्गदर्शन मा.सौ.वसुधा नाईक सुप्रसिद्ध कवयित्री यांनी आपल्या स्वरचित बालगीतातून अक्षर ओळख करून दिली,मुलांकडून बालगीत म्हणून घेतले.

मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तसेच मा. सारिका सासवडे यांनी आपल्या स्वरचित बालगीतातून मुलांना अंक ओळख करून दिली.या वेळी सौ.वसुधा नाईक यांनी सांगितले, की या फुटपाथ शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी शिकणे ,शिकवणे गरजेचे आहे. म्हणजे आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे, त्यासाठी केलेला हा उपक्रम मराठी भाषेसाठी आदर्श ठरेल.

काव्ययोग काव्य संस्था पुणे अध्यक्ष मा.योगेश हरणे यांनी सांगितले हा उपक्रम घेण्या मागचा उद्देश असा आहे की, मुलांचे शब्द भांडार समृध्द व्हावे या साठी केलेला हा पहिला उपक्रम यशस्वी रित्या पार पडला.या उपक्रमाचे आयोजन गौरव पुंडे,गौरी महाजन यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी झाला. मुलांना खाऊ वाटला. बक्षीस दिले. कार्यक्रमाचा समारोप शैक्षणिक आरोळी देऊन केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे