0
4
8
2
8
6
हसरा चेहरा
कालचा हसरा चेहरा
आज उदास भासला
काय घडले अक्रीत
काही उमगेना मजला
धरला अबोला असा का
नसे भान तिला कशाचे
कोमेजली कळी फुलांची
चित्त सैरावरा धावे तिचे
घेऊन विश्वासात तिजला
केली मी विचारपूस पुरती
फोडला हंबरडा असा की
जणू सागराला यावी भरती
वासनांध गिधाड टोळक्यांनी
केली छेडछाड भररस्त्यात
धावला ना कुणी मदतीला
उभे मुर्दाड पाहणारे चौकात
सशक्त नारी तू भारताची
जागवला आत्मविश्वास तिचा
शहारली स्फुरली ताठरली
जणू अवतार रणरागिणीचा
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जि.नांदेड
=========
0
4
8
2
8
6



