गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील रचना
मुख्य संपादक:राहुल पाटील
*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट चौदा🎗🎗🎗*
*🌤️विषय: कसेही पण असेही🌤️*
*🔹गुरूवार : २९ / ०५ /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १७१साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कसेही पण असेही*
कसेही पण असेही नकोच
धोक्याचा हा जीवन प्रवास
बेफिकीर जगणे पोटासाठी
पण घरादाराला परतीची आस.
*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
➿➿➿➿📗📣📗➿➿➿➿
*कसेही पण असेही*
बिनधास्त आम्ही जीवनात
नसेल एसी कारची हवा
कसेही पण असेही
ट्रॅक्टरचा आनंद घेता यावा
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📗📣📗➿➿➿➿
*कसेही पण असेही*
कष्टकरी आम्ही मस्त कलंदर
जगण्याची आमची न्यारीच तऱ्हा
कसेही पण असेही…..
आनंद घेतो खराखुरा..
*सौ सुरेखा कोरे,नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📗📣📗➿➿➿➿
*कसेही पण असेही*
कसेही पण असेही
जे आहे ते आहे पसंत
मनसोक्त लुटतो आनंद
जे नाही त्याची नसे खंत…
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📗📣📗➿➿➿➿
*कसेही पण असेही*
शेतकरी राजा कष्ट करून
जगतो कसेही पण असेही राहतो
चिमुरड्या ट्रॅक्टर मधून ओझं
जिवापेक्षा जास्त वाहतो
*सौ. सुरेखा रा.चित्ते*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿📗📣📗➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कसेही पण असेही*
कसेही पण असेही
मौज लुटू बालपणाची
जीवन जगतो आनंदाने
खंत नसे आम्हा गरीबीची
*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📗📣📗➿➿➿➿
*कसेही पण असेही*
आनंदासाठी पैसा हवा
अशीच म्हणतात सारे
कसेही पण असेही
बिनधास्त जगतात बिचारे
*सौ.शशी मदनकर,ब्रम्हपुरी*
*जिल्हा_चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📗📣📗➿➿➿➿
*कसेही पण असेही*
काहो आमच्याच नशिबी गरिबी
मग आम्ही कशा रितीने जगावं
राहावं कसेही पण असेही कां
नुसते स्वप्नच पाहतच राहावं !
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿📗📣📗➿➿➿➿
*कसेही पण असेही*
जीवनाच्या प्रवासात
बिनधास्त जगतो आम्ही
क्षण असो कसेही पण
असेही सुख वेचतो आम्ही
*कंचना मंडपे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📗📣📗➿➿➿➿
*कसेही पण असेही*
संकटकाळी कामात येई,
मनातले ओळखून घेई,
कसेही पण असेही नाते,
माणसे जोडणारे हे खाते//
*उर्मिला राऊत*
*फ्रेंड्स कॉलनी नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📗📣📗➿➿➿➿
*कसेही पण असेही*
कसेही पण असेही
प्रवासात ध्येय ठेवावे
पुढे चालावे, दुःख विसरावे
जीवन मस्त जगावे कसेही
*सौ. हर्षा कुणाल सहारे, नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📗📣📗➿➿➿➿
*कसेही पण असेही*
कसेही पण असेही
घ्या आनंद जीवनाचा
क्षणभंगुर जीवनात
नाही क्षण परत यायचा
*विजय शिर्के , छं . संभाजी नगर .*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📗📣📗➿➿➿➿
*कसेही पण असेही*
गाडीत गोण्यांवर मित्रांशी गप्पा
प्रवासात दुःखाचा पडतो विसर
कसेही पण असेही दिवस
जीवन होते सहज सुकर
*सौ गौरी संतोष नेर्लेकर*
*ता. नेवासा जि. अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📗📣📗➿➿➿➿
*कसेही पण असेही*
कसेही पण असेही
जगणे आलेच की जीवनात
परिस्थितीने पोत्यावर झोप पूर्ण
बिनधास्त जीवन जगतात
*सौ.कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📗📣📗➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖



