Breaking
ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

तळ्यात मळ्यात

वसुधा वैभव नाईक

0 4 8 2 8 4

तळ्यात मळ्यात

बाई बाई चला ना खेळायला
बरं चला मुलांनो पळायला….

पळा पळा लांब लांब पळा पळा
दोन जणांनी गळ्यात घाला गळा…

राम, शाम काय चाललंय आता
अजिबात कोणाशी मारू नका बाता…

त्याला बरं एकत्र येऊन सारे
ऐकून घेऊ खेळाचे नियम न्यारे…

तळ्यात मळ्यात आपण खेळूया
खेळाचे नियम सर्वांनी पाळूया….

गोला मध्ये उभे राहा पाहू बरं
चीटिंग कोणी करायचे नाही खरं…

तळ्यात म्हटलं की आत उडी मारायची
मळ्यात म्हटलं की बाहेर ठोकायची…

प्रथम जरा आपण सर्व सराव करूया
नंतर मात्र तळ्यात मळ्यात खेळूया….

सराव झाला छान करून
छोटी मुले गेली खेळात दंगून…

छान खेळ आता चालू झाला
मुलांचा जीव खेळतच रमला…

वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा – पुणे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे