‘गोरे होण्यासाठी गोळ्या खाताय?” दैवी उपाय करून तर पहा…!!!
तृप्ती पाटील लेखिका, मुंबई

‘गोरे होण्यासाठी गोळ्या खाताय?” दैवी उपाय करून तर पहा…!!!
हल्ली लोक बोटॉक्स करतात. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो, सुरकुत्या कमी होतात. गोरे होण्यासाठी गोळ्या खातात. पण गोरे होण्याच्या गोळ्या खाल्ल्या की कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. त्या गोळ्या वर्षभर किंवा सहा ते सात महिने घ्याव्या लागतात. बोटॉक्ससुद्धा चार ते पाच महिन्यांनी सतत करावा लागतो, तरच स्किन टाईट राहते आणि सुरकुत्या कमी होतात. बोटॉक्स केल्यानंतर चार तास झोपू नये; माणसाला एकाच ठिकाणी बसावे लागते. तरीही त्या बोटॉक्सचा पूर्ण उपयोग होत नाही. किती ‘झंझंट’ ती..!!
मला इथे एकच सांगायचे आहे. एवढे महागडे उपचार करण्यापेक्षा आपल्या दैवी शक्तीने आपण आपली त्वचा सुधारू शकतो. सोहम साधना केली, श्वास आत घेताना “सो” आणि सोडताना “हम” ही साधना जर तुम्ही केली, तर तुमच्या त्वचेची इलास्टिसिटी उत्तम होते. तुमची त्वचा अधिक तरुण दिसू लागते. मंत्रजप जर आपण केला तर त्या मंत्रजपानेसुद्धा चेहऱ्यावर वेगळे दैवी तेज येते.
त्रिपुरी सुंदरीची साधना केली, त्रिपुरी सुंदरीचे स्तोत्र मिळते; ते स्तोत्र जर रोज अकरा वेळा वाचले, तरी चेहऱ्याला वेगळा ग्लो येतो आणि चेहरा तुकतुकीत होतो. गोरे होण्यासाठी गोळ्या खाण्यापेक्षा रोज आवळा खाल्ला, तरी दीड–पावणे दोन वर्षांत त्वचा उजळू लागते. रोज नाचणीचा लाडू खाल्ला किंवा नाचणीचे सत्त्व घेतले, तरी चेहऱ्यावरील कोलेजन उत्तमरीत्या टिकते. त्याबरोबर रोज दोन चमचे तूप खाल्ले, तरी स्किनमधील कोलेजन टिकून राहते. सूर्यनमस्कार रोज घातले, तरी स्किन उत्तम राहते, केस गळणे थांबते, चेहऱ्याला ग्लो येतो. पण सूर्यनमस्कार घालताना सूर्यदेवाच्या प्रत्येक मंत्राचा जप केला, तर चेहऱ्यावर आणखी तेज येते. योगासने केली, तरी चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.
परंतु सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, जर आपण सोहम साधना मंत्रजपासह केली, तर चेहऱ्याला काही लावण्याची गरजच लागत नाही; इतका चेहरा सुंदर होतो. त्याबरोबर त्रिपुरा सुंदरीचे स्तोत्र अकरा वेळा म्हटले, तरी ती व्यक्ती आकर्षक व सुंदर दिसते. हा सर्व दैवी चमत्कार आहे. आपण साधना उत्तम रीतीने केली, तर एवढे महागडे उपचार करण्याची गरज नाही. हे महागडे उपचार करून आपण आपल्या शरीरात आतून केमिकल्स टाकतो; पण जर आपण दैवी उपचार केले, तर त्याचा काहीही साईड इफेक्ट होत नाही. उलट आपली पुण्याई वाढते, विकार कमी होतात. त्याबरोबर त्वचा आणि केसही सुंदर होतात.
आता त्रिपुरा सुंदरीचे स्तोत्र खाली देत आहे. ते सर्वांनी रोज अकरा वेळा वाचा. त्यामुळे तुम्ही आकर्षक व सुंदर दिसाल. चेहऱ्यावर दैवी तेज येईल आणि सुरकुत्या कमी दिसतील. रोज तूप जरी लावले, तरी चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येत नाहीत. शेवटी बघा, माणसाला म्हातारे व्हायचेच आहे. त्यामुळे सुरकुत्या येणारच; कोणीही कायम तरुण राहू शकत नाही, हेही लक्षात घ्या. पण आकर्षक दिसू शकतो, दैवी तेजस्वी दिसू शकतो आणि सुंदर नक्कीच दिसू शकतो.
श्री त्रिपुरा सुंदरी स्तोत्र (मराठी)
॥ नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः ॥
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ॥
त्रिपुरा सुंदरी माता, त्रिभुवनींची तू राणी ।
करिते भक्तांवर कृपा, दयाळू तू जगजननी ॥
कांचनवर्णी रूप तुझे, चंद्रकोरी भालावर ।
कमलासनावर विराजे, तेज झळके सर्वांवर ॥
शंख चक्र गदा पद्म, करांत तुझ्या शोभती ।
दुष्टांचा नाश करिती, भक्तांची रक्षा करती ॥
सुख-समृद्धी देणारी, दुःख हरिणारी अंबा ।
तुझ्या नामस्मरणाने, शांत होई जीवांबा ॥
त्रिगुणांची तू अधीश्वरी, माया तुझी अपरंपार ।
तुझ्या चरणी ठेवुनी मस्तक, होई जीवन उद्धार ॥
॥ इति श्री त्रिपुरा सुंदरी स्तोत्रम् समाप्तम् ॥
तृप्ती पाटील
लेखिका, मुंबई
======



