
0
4
0
9
0
3
वळण
तुझ्यात अशी एकरूप होते
जशी नयनात नजर असते
तुझ्या रूपाने नजर गेली
आता मी आंधळी भासते…..
पर्वताएवढे दुःख सुद्धा
तुझ्यासह स्वीकारले असते
आता राई एवढे सुख सुद्धा
तुझ्यावाचून विष वाटते….
तुझ्या क्षणाचा सहवास
युगांचा विरह झाला आहे
जो होता दोघांचा प्रवास
तो एकटीचा बनला आहे…
आता प्रत्येक वळणावर
धोक्याची घंटी वाजते आहे
सांभाळू कसे यौवन धन
काळजाचा ठोका चुकतो आहे….
जर तुझ्या आधीच मला
मृत्युनी गाठले असते
तर या रोजच्याच जगण्यापेक्षा
ते गौरवाचे मरण ठरले असते…
वर्षा मोटे पंडित
छत्रपती संभाजी नगर
0
4
0
9
0
3





