Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरब्रेकिंगमहाराष्ट्रविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

ग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंचानी आपला अधिकार वापरावा: कुश मोटवानी (भाप्रसे)

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 4 8 2 8 2

ग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंचानी आपला अधिकार वापरावा: कुश मोटवानी (भाप्रसे)

आनंद लहरीत सरला ‘साप्ताहिक महाराष्ट्र सपूत’ चा वर्धापन दिन, दिनदर्शिका प्रकाशन आणि मान्यवरांचा सन्मान सोहळा

नागपूर: भारताची लोकशाही अधिक सक्षम बनविण्यासाठी ग्राम विकासाचा पाया मजबूत असायला हवा त्यासाठी ‘विद्यमान सरपंच यांनी अधिकाधिक जनजागृतीची मोहीम हाती घेऊन आपल्याला असलेल्या अधिकारांचा पुरेपूर वापर करावा’ असे प्रतिपादन मा. कुश मोटवानी (भाप्रसे) यांनी केले. ते डॉ बाबासाहेब आंबेडकर, सांस्कृतिक सभागृह, उरुवेला कॉलनी वर्धा रोड नागपूर येथे (दि १) आयोजित ‘साप्ताहिक महाराष्ट्र सपूत’ च्या वर्धापन दिनानिमित्त दिनदर्शिका प्रकाशन समारंभ आणि मान्यवरांचा सन्मान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, गावातील नागरिकांनी शासनाच्या सर्व उपक्रमात सहभागी होऊन आपले योगदान द्यावे. करिता सरपंच, ग्रामसेवक यांनी पुढाकार घेऊन गावात निधी कसा उभारता येईल याकडे विशेष लक्ष देऊन विविध विकासोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करावे.

नागपुरातील प्रसिद्ध ‘साप्ताहिक महाराष्ट्र सपूत’ ने पत्रकारितेची यशस्वी बारा वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने वर्धापन दिवस, लोगोचे अनावरण आणि दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी निष्पक्ष व निर्भीड पत्रकार आणि ग्राम स्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सरपंच, सचिव, सामाजिक संस्था यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मा.अनिल खडसे (IRS) उपायुक्त आयकर विभाग, मुख्य अतिथी मा.कुश मोटवानी (IAS) भारतीय प्रशासकीय सेवा, नागपूर तर प्रमुख पाहुणे मा. विनोद जीवतोडे (गुरुजी) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र सपूत संपादक मा.प्रविण अडागळे, मा.सेवकराम राऊत कार्यकारी संपादक, सहसंपादक मा. दिवाकर कडू, उपसंपादक मा.राजुभाऊ कांबे हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

महामानवाच्या प्रतिमा पूजनानंतर विचारमंचावरील सर्व मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र सपूतचे संपादक मा.प्रविण अडागळे यांनी आपल्या प्रास्ताविकात बारा वर्षाचा प्रवास तसेच आलेली संकटे, केलेला संघर्ष मांडला. सर्व पाहुण्यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अनिल खडसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून राज्यसेवा, भारतीय प्रशासकीय सेवेची तयारी करतांना वर्तमानपत्राची भूमिका विषद केली. ग्रामस्तरावर काम करतांना येणा-या अडचणींचा सामना करण्यासाठी अभ्यासपूर्ण निर्णय घेणे महत्वाचे असते असे अधोरेखित केले.

आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शहरातील निवडक निष्पक्ष व निर्भीड पत्रकारांना ‘पत्रकार रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सत्कारमूर्तीमध्ये मा. राहुल पाटील संपादक ‘साप्ताहिक साहित्य गंध व बिनधास्त न्यूज’, श्री चंद्रकांत भोयर, संपादक विदर्भ माझा, श्री-योगेश बावणे साप्ताहिक विदर्भ नंदन, श्री रवींद्र नंदनवार संपादक दैनिक लोकराग, श्री सुभाष राऊत संपादक दैनिक चिरकाल सत्य, ‘इशिका धार्मिक प्रतिनिधी इंडिया न्यूज २८, श्री युवराज मेश्राम महाराष्ट्र संदेश न्यूज, श्री पाडुरंग भोंगाडे साप्ताहिक निर्भीड, श्री रजत डेकाटे भिवापूर तालुका प्रतिनिधी मार्मिक, श्री ओंकार चेके संपादक प्रेस शक्ती यवतमाळ,श्री प्रदिप शेंडे संपादक, विदर्भ कल्याण यांचा समावेश होता.

सत्कारमूर्ती ग्रामपंचायत पदाधिकारी:

श्री शरद ढोके सरपंच तेलगाव, श्री शरद जुनघरे सरपंच मांडवी, श्रीअमोल फुलारे सरपंच पिपळा (किन.), श्री धर्मराज आसोले सरपंच भवासावंगी, श्री प्रवीण झाडे सरपंच बोरुजवाडा, सौ रूपाली कोहळे सरपंच वाकोडे, श्री अनिल कोळमेघ सरपंच थेरला, सौ सीमा गुडधे सरपंच ईसापुर, सौ शामकला सुनिल खंडाळकर सदस्य ग्रा.पं. उबाळी, सौ प्रतिभा गायकवाड़ सरपंच माळेगांव, श्री अरविंद ढोणे सरपंच इसासनी, श्री आकाश तेलंगे सरपंच पारडी, श्री संजय धुर्वे सरपंच परसोडी (वकील), श्री रोशन खाडे उपसरपंच बोरगांव (खु.), श्री दिवाकर कडू ग्रा.पं. सदस्य धापेवाडा,

सामाजिक कार्य संस्था आणि व्यक्ती:

सम्राट प्रसेनजित समाज विकास संस्था नागपूर. बहुजन रयत परिषद वर्धा, अजय डोंगरे, हीराताई खडसे सौ. निशाताई खडसे धापेवाडा, श्री मंगेश गमे कळमेश्वर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सावनेर यांनाही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन अमित वाघमारे, मनिष अडागळे यांनी केले, तर आभार दिवाकर कडू यांनी मानले. याप्रसंगी शहरातील व ग्रामीण भागातील वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. महाराष्ट्र सपूत परिवाराने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपले अमूल्य असे योगदान दिले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे