Breaking
गुन्हेगारीनागपूरब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियविदर्भ

राजकीय पोस्ट टाकल्याने पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी; वॉर्ड क्रमांक ४ मधील खळबळजनक प्रकार

नागपूर शहर प्रतिनिधी

0 5 5 0 7 5

राजकीय पोस्ट टाकल्याने पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी; वॉर्ड क्रमांक ४ मधील खळबळजनक प्रकार

उपराजधानीत सर्रास घडताय असे प्रकार

पत्रकारितेवर हल्ला करणारे ‘भाडोत्री’ कुणाचे?

नागपूर जिल्हा प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

सिर्सी/उमरेड: निवडणुकीचे वारे वाहत असतानाच आता वैयक्तिक धमक्यांचे सत्र सुरू झाले असून, सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याच्या कारणावरून एका पत्रकाराला चक्क ‘पाहून घेण्याची’ धमकी देण्यात आली आहे. वॉर्ड क्रमांक ४ चे मतदार तथा स्थानिक पत्रकार अखिल रोडे यांना भाजप समर्पित उमेदवाराकडून धमकीचे फोन आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार अखिल रोडे यांनी ‘तेली समाज’ या व्हॉट्सॲप ग्रुपवर काँग्रेस समर्पित उमेदवार निवडून येईल, असा विश्वास व्यक्त करणारी आणि समाजाची रूपरेषा मांडणारी एक पोस्ट टाकली होती. या पोस्टचा राग धरून भाजप समर्पित उमेदवाराने त्यांना फोन करून धमकावल्याचा आरोप रोडे यांनी केला आहे. “निवडणुकीत मतदान करायला गावात ये, मग तुला पाहून टाकू,” अशा शब्दांत त्यांना धमकी देण्यात आली.

सामाजिक कार्यकर्त्याचे नाव घेताच संताप

धमकी देणाऱ्या व्यक्तीने फोनवर बोलताना ‘काँग्रेस नेतेही माझेच काम करत आहेत’ अशी बतावणी केली. मात्र, जेव्हा अखिल रोडे यांनी सामाजिक कार्यकर्ते मुकेश झाडे यांचे नाव घेतले, तेव्हा समोरून धमक्यांचे सत्र अधिकच वाढले. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार असताना, एका पत्रकाराला अशा प्रकारे लक्ष्य केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

पत्रकारितेवर हल्ला

एकीकडे निष्पक्ष पत्रकारितेच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसऱ्या बाजूला सत्य मांडणाऱ्या किंवा आपले मत व्यक्त करणाऱ्या पत्रकारांना थेट धमक्या दिल्या जात आहेत. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या प्रकरणी आता अखिल रोडे काय पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 5 0 7 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे