Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

श्री काळभैरव तालीम संघ,आवासचे कुस्ती स्पर्धेत सुयश

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 9 4

श्री काळभैरव तालीम संघ,आवासचे कुस्ती स्पर्धेत सुयश

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग:( दि ११) बुधवार दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी अलिबाग तालुक्यातील नांदाईपाडा येथे नांदाईदेवी क्रीडा मंडळ, नांदाईपाडा यांनी साखरचौथ गणेशोत्सवाच्या निमित्ताने भव्य – दिव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते.

या स्पर्धेत बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवासचे माजी मुख्याध्यापक / माजी प्राचार्य, रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस, रायगड भूषण प्रमोद मनोहर भगत सर यांच्या अथक परीश्रमातून व बहुमोल मार्गदर्शनातून घडलेल्या पैलवानांच्या श्री काळभैरव तालीम संघाने नेत्रदिपक खेळाचे प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली आणि या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.

आयोजकांच्या वतीने श्री काळभैरव तालीम संघ, आवास मधील विजयी पैलवानांना वैयक्तिक रोख रक्कम स्वरुपात पारितोषिके व संघाला रोख रक्कम स्वरुपात पारितोषिक व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

श्री काळभैरव तालीम संघ, आवासचे प्रशिक्षक प्रमोद मनोहर भगत सर व सर्व यशस्वी पैलवानांचे अलिबाग तालुका पंचायत समिती माजी सदस्य रणजीत प्रभाकर राणे, ग्रुप ग्रामपंचायत आवासच्या सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य अभिजीत प्रभाकर राणे, उपसरपंच राजेंद्र वाकडे, सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आवास व पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच कुस्ती प्रेमी कडून श्री काळभैरव तालीम संघ, आवास मधील पैलवान व प्रशिक्षक प्रमोद मनोहर भगत सर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे