स्व. प्रभाकरजी सदाशिव राणे यांची एकविसावी पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

स्व. प्रभाकरजी सदाशिव राणे यांची एकविसावी पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात संपन्न
पूर्व प्राथमिक व स्व. प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळा, आवास मध्ये आयोजन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज मिडीया
अलिबाग: सोमवार दि. ३० मार्च २०२६ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या पूर्व प्राथमिक व स्व. प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळा, आवास मध्ये स्व. प्रभाकरजी सदाशिव राणे यांच्या एकविसाव्या पुण्यतिथीचा कार्यक्रम स्व. प्रभाकरजी सदाशिव राणे यांचे नातू अंशुमन अभिजीत राणे यांच्या अध्यक्षतेखाली भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय प्रभाकरजी राणे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून उपस्थित सर्वांनी प्रतिमेचे पूजन केले.
स्व. प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रसिका म्हात्रे मॕडम यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्व. प्रभाकरजी सदाशिव राणे यांची महती सांगून त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
त्यानंतर विशाल पाटील सर यांनी अतिशय सुंदररीत्या एक अभंग सादर केला. त्याला यतिश शिंदे सर यांनी तितकीच सुंदर तबला साथ केली.
स्व. प्रभाकरजी राणे यांचे नातू तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष अंशुमन अभिजीत राणे, संस्थेचे उपाध्यक्ष अॕडव्होकेट जयंत चेऊलकर, सामाजिक कार्यकर्ते देविदास म्हात्रे, रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे विद्यमान सरचिटणीस तथा बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे माजी मुख्याध्यापक / माजी प्राचार्य प्रमोद भगत सर, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे विद्यमान मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, प्राथमिक विभाग शिक्षक प्रतिनिधी सुप्रिया राऊळ मॕडम यांनी आपल्या मनोगतातून स्व. प्रभाकरजी सदाशिव राणे यांची महती सांगून त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
इ. ४ थी मधील महेक उदय वाडकर व अनुश्री दिनेश खांबे या विद्यार्थीनींनी अतिशय सुंदर भाषणे करून स्व. प्रभाकरजी सदाशिव राणे यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाला स्व. प्रभाकरजी सदाशिव राणे यांचे नातू अंशुमन अभिजीत राणे, आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे उपाध्यक्ष अॕडव्होकेट जयंत चेऊलकर, सचिव प्रभाकर म्हात्रे, खजिनदार सुवर्ण कांबळी, कार्यकारिणी सभासद दिपक राऊळ, कार्यकारिणी सभासद अनिल राऊळ, अलिबाग तालुका पंचायत समिती उपसभापती प्रिया प्रमोद भगत, ग्रामपंचायत सदस्य सुधीर राऊळ, ग्रामपंचायत सदस्या सुहासिनी राणे, ग्रामपंचायत सदस्या संचिता कवळे, ग्रामपंचायत सदस्या विनया घरत, ग्रामपंचायत सदस्या दिपाली मोहिते, रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस तथा बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माजी मुख्याध्यापक प्रमोद भगत सर, माजी लिपीक प्रकाश राणे सर, सामाजिक कार्यकर्ते देविदास म्हात्रे, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, स्व. प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रसिका म्हात्रे मॕडम, बालवाडी प्रमुखा प्रमोदिनी पाठक मॕडम, माध्यमिक विभाग शिक्षक प्रतिनिधी यतिश शिंदे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी गणेश राणे सर, प्राथमिक विभाग शिक्षक प्रतिनिधी सुप्रिया राऊळ मॕडम, आवास ग्रामपंचायत कर्मचारी नरेश भगत, पराग गावडे, सनी कवळे, सर्व विभागातील सर्व शिक्षक, सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी व इ. १ ली ते इ. ४ थी पर्यंतचे सर्वं विद्यार्थी उपस्थित होते.
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे सहाय्यक शिक्षक धनंजय भगत सर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर बालवाडी प्रमुख प्रमोदिनी पाठक मॕडम यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.



