0
1
9
8
8
5
अश्रू गळू देईना
कसे सांगू कुणा, मुळी काही कळेना..
लपलेला भाव,अश्रू गळू देईना…धृ
कधीकाळी झालेला सलतोय घाव,
अर्ध्यावरती मोडलेला प्रेमाचा डाव…
डोळ्यातले आसवे टळता टळेना…१
लपलेला भाव,अश्रू गळू देईना…
अंकुरलेली भावना कुस्करून गेली…
थोडीशीही कीव कुणा नाही आली…
पाळलेल्या आशा पार नाही नेईना…२
लपलेला भाव,अश्रू गळू देईना…
चौफेर काळोख अंधारलेल्या वाटा…
एकावर एक येती संकटाच्या लाटा…
सुखाचा किनारा कुठेच गवसेना…३
लपलेला भाव,अश्रू गळू देईना…
आशा लय भारी नभी उडण्याची…
साथ नाही हवा भीती पडण्याची…
“सुधाकरा” कुणी सोबतीला नाहीना…४
लपलेला भाव,अश्रू गळू देईना..
सुधाकर भगवानजी भुरके
आर्य नगर नागपूर
===========
0
1
9
8
8
5