Breaking
ई-पेपरकवितानागपूरपुणेसाहित्यगंध

मी असेन तुझ्यासोबत

पांडुरंग एकनाथ घोलप

0 1 9 8 8 5

मी असेन तुझ्यासोबत

चालत जा तू पुढे पुढे
तुझ्या कर्तृत्वाच्या वाटेने
मी असेन तुझ्यासोबत
तुझ्या सावलीच्या रूपाने ||१||

हा मार्ग तुझा नसे एकला
मीच तुझा आहे सोबती
तुझ्या पाठीशी राहीन सदा
नको बाळगू तमा कोणती ||२||

ध्येयपथावर मिळावे सारे
जे जे आहे तुला अपेक्षित
समजू नकोस तू स्वतःस
कधीही अणुमात्र उपेक्षित ||३||

तू माझी सहधर्मचारीणी
मला आहे सार्थ अभिमान
तुझ्या कर्तृत्वाला मिळो सदा
झळा यशाची दैदीप्यमान ||४||

तुझ्या किर्तीचा सुगंध वारा
पसरेन दाही दिशा दूरवर
मी असेन तुझ्यासोबत
वचन हे माझे आहे निरंतर ||५||

पांडुरंग एकनाथ घोलप
ता.जुन्नर, जि.पुणे
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 9 8 8 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे