द.बा. घुमरे पब्लिक स्कूल येथे उद्या जयंती समारोह, बक्षीस वितरण व पुस्तक प्रकाशनाचे आयोजन
माजी मंत्री मा. सुरेशजी नवले व माजी आमदार ना.राजेंद्रजी जगताप यांची प्रमुख उपस्थिती
द.बा. घुमरे पब्लिक स्कूल येथे उद्या जयंती समारोह, बक्षीस वितरण व पुस्तक प्रकाशनाचे आयोजन
प्रसिद्ध कवयित्री शर्मीला देशमुख घुमरे यांच्या बालकाव्य संग्रहाचे प्रकाशन
शर्मीला देशमुख घुमरे यांचा ‘वाघाची मावशी’ हा पहिलाच बालकाव्यसंग्रह
माजी मंत्री मा. सुरेशजी नवले व माजी आमदार ना.राजेंद्रजी जगताप यांची प्रमुख उपस्थिती
जिल्हा प्रतिनिधी बीड
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
बीड (दि ११): छत्रपती संभाजी राजे शिक्षण प्रसारक मंडळ पारगाव (घुमरा) ता.पाटोदा जि.बीड संचलित “द.बा. घुमरे पब्लिक स्कूल बीड” येथे प्रेरणास्थान स्वर्गीय द.बा. घुमरे (तात्या) यांच्या जयंती निमित्त स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण, पालक मेळावा, बालकविता संग्रहाचे प्रकाशन तसेच जयंती समारोह व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रेरणास्थान स्वर्गीय द.बा घुमरे (तात्या) यांच्या जयंती दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 12 फेब्रुवारी 2025 वार बुधवार सकाळी ठीक 9 वाजता जयंती समारोप कार्यक्रमाची सुरुवात होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. राजेंद्रजी जगताप (माजी आमदार) तसेच उद्घाटक म्हणून प्रा. सुरेशजी नवले ( माजी मंत्री महाराष्ट्र राज्य ) यांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहील. मा.श्री.राहुलजी पाटील (संस्थापक अध्यक्ष मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर ), श्री भानुदासजी जाधव ( चार्टर्ड अकाउटंट बीड), मा.श्री. सुदामराव शिंदे (संस्थापक अध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघ ), मा.श्री. भारतजी सातपुते (ज्येष्ठ कवी तथा साहित्यिक लातूर), मा. श्री. गंगाधर काळकुटे (संपादक दैनिक सूर्योदय), मा श्री मोहनराव क्षीरसागर (अध्यक्ष चक्रधर शिक्षण व समाज प्रबोधन मंडळ), मा.श्री. संग्रामजी कुमठेकर (सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह नागपूर), मा.श्री. कल्याण वाघमारे ( माजी कार्यवाह मराठवाडा शिक्षक संघ), मा.श्री. सुभाषराव पवळ (सचिव समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ), मा.श्री. विलासजी बडगे साहेब (माजी जि.प.सदस्य ), मा.श्री. उत्तमराव पवार (ज्येष्ठ शिक्षक नेते तथा सचिव शिक्षण संस्था महामंडळ), मा.श्री. गणेश वाघ (शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळ) विविध स्पर्धा परीक्षांचे बक्षीस वितरण केले जाईल.
बीड येथील प्रसिद्ध कवयित्री व लेखिका तसेच मराठीचे शिलेदार समूहाच्या मुख्य परीक्षक शर्मिला देशमुख/घुमरे लिखित “वाघाची मावशी” या बालकाव्य संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमासाठी सर्व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मार्गदर्शक मा. श्री.दीपकदादा घुमरे (जिल्हाध्यक्ष तथा सहकार्यवाह महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ छ.संभाजीनगर विभाग) यांनी केलेले आहे.





