Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरब्रेकिंगमहाराष्ट्रमुंबईविदर्भसाहित्यगंध

सेंट रिंझाई स्कूलचे दोन दिवसीय स्नेहसंमेलन थाटात संपन्न

प्रा. निलिमा डोंगरे व राहुल पाटील यांचे समारोपीय प्रेरणादायी मार्गदर्शन

0 4 8 2 8 2

सेंट रिंझाई स्कूलचे दोन दिवसीय स्नेहसंमेलन थाटात संपन्न

प्रा. निलिमा डोंगरे व राहुल पाटील यांचे समारोपीय प्रेरणादायी मार्गदर्शन

प्राचार्य झेनीथ जवादे यांनी मानले पालकांचे आभार

जिल्हा प्रतिनिधी नागपूर

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर (दि ३० डिसे.): उत्तर नागपूर येथील प्रतिष्ठीत सेंट रिंझाई पब्लिक स्कूल, बिनाकी मंगलवारी, कांजी हाऊस नागपूरचे दोन दिवसीय सांस्कृतिक स्नेहसंमेलन रेनबो २०२५ चा समारोप आज (दि ३०) रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेक्शन सेंटर, लाल गोडाऊन, कामठी रोड, नागपूर येथील सभागृहात पार पडला.

डॉ. प्रा. निलिमा जवादे डोंगरे, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, नवी मुंबई, मा. राहुल पाटील, संपादक साप्ताहिक साहित्यगंध व बिनधास्त न्यूज व अध्यक्ष, मराठीचे शिलेदार संस्था, नागपूर यांनी विद्यार्थी व पालकांना प्रेरणादायी मार्गदर्शन करून पाल्य हीच आपली संपत्ती असून त्यांच्या पंखात उर्जा भरण्याचे काम पालकांनी करावे असे आवाहन याप्रसंगी मान्यवरांनी केले. सेंट रिंझाई पब्लिक स्कूलचे प्राचार्य झेनीथ जवादे यांनी आपल्या आभारीय मनोगतात सांगितले कि, मागील २० वर्षापासून शिक्षण क्षेत्रात सेंट रिंझाईची यशस्वी वाटचाल सुरू असून दहावीचा निकाल दरवर्षी १००% लागतो तर ओपन मेरीट येणा-या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत असल्याचे झेनीथ जवादे म्हणाले.

याप्रसंगी जवादे यांनी दोन दिवसीय सांस्कृतिक स्नेहसंमेलनास उपस्थित असलेल्या नर्सरी, वर्ग १ ते १० वीच्या सर्व पालकांचे मनापासून आभार मानले. ही यशाची परंपरा कायम रहावी यासाठी आपल्या सहकार्याची व विश्वासाची जोड आवश्यक असून आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी नेहमी त्यांच्या पाठीशी राहून कौतुक करावे असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन पर्यवेक्षिका आल्फिया शेख मैडम यांनी केले. ज्येष्ठ समाजसेवक व शिक्षणप्रेमी मा. अशोक पाटील, चंद्रपूर यांनी सर्वोत्कृष्ट नृत्य सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना बक्षीस म्हणून रोख रक्कम दिली. तसेच शिक्षणप्रेमी राकेश टाकळीकर यांनीही मुलांना रोख बक्षीस देऊन अभिनंदन केले.

थाटात संपन्न झालेल्या दोन दिवसीय वार्षिक सांस्कृतिक स्नेहसंमेलनास श्रीमती कुसुम जवादे, मराठीचे शिलेदार संस्थेच्या सचिव पल्लवी पाटील, कु. हर्षिता पाटील, विजेता जवादे, प्रशांत सोमकुवर, राकेश टाकळीकर, लोकमान अन्सारी, धर्मेंद्र मेश्राम, निलेश मोहाडीकर व सर्व शिक्षक वृंद, नृत्य प्रशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे