
0
5
1
7
9
5
अपेक्षा
गुलाब,चाफा,मोगरा
केतकीची कळी तू
सौंदर्याचा अफाट सागर
आहे अजुनी खुळी तू
चंद्राची , चंद्रकला तू
चांदण्यांचा साज-श्रृंगार
कस्तुरीचा सुगंध तू
नयनांना तुझीच आस
रूक्ष मनाची हिरवळ तू
मृग नक्षत्राचा जणू सुवास
लांब असुनिया भासते
जणू माझीया आसपास
मंद मंद वाहणारी सरीता
स्मरण तुझे करुनी देई
गतकाळात मागे वळता
हृदय उंच भरारी घेई
आयुष्याच्या वळणावर
तू भेटावी क्षणभर
विसरुन सारे रुसवे फुगवे
जवळ यावे घटीका भर
पंकज रामकृष्ण चारथळ
कोराडी रोड, जि.नागपूर
=========
0
5
1
7
9
5



