आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध
साथ दे,हात दे
हणमंत गोरे ता:सांगोला,जि:सोलापूर
0
4
8
2
8
6
साथ दे,हात दे
“माय मराठीला आपल्या
मनापासून साथ दे,हात दे”
“दिवसातून एकदातरी
जीवनातला वेळ दे,क्षण दे”
“मराठी भाषेला आपल्या
हृदयापासून साथ दे ,हात दे”
“बोलताना व्यवहारात
मराठीला महत्व दे,प्रेम दे”
“मराठी सक्षमीकरणासाठी
अंतकरणापासून साथ दे, हात दे”
“मराठी शिलेदार समूहाला
लिहण्यास हात दे,बळ दे”
“मराठी शाळेला आपल्या
भौतिक,आर्थिक साथ दे,हात दे”
“गरीब कष्टकऱ्यांच्या मुलांना
शिकण्यास हाक दे,हक्क दे”
“मराठी माणसांना आपल्या
उद्योगासाठी साथ दे,हात दे”
“दुष्काळानं होरपलेल्या आपल्या
पोशिंद्याला मदत दे,जीवदान दे”
हणमंत गोरे
ता:सांगोला,जि:सोलापूर
=========
0
4
8
2
8
6



