प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या परमज्योती भवनाचे राजयोगिनी बी.के.संतोषी दिदीजींच्या हस्ते उद्घाटन
प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या परमज्योती भवनाचे राजयोगिनी बी.के.संतोषी दिदीजींच्या हस्ते उद्घाटन
तालुका प्रतिनिधी, नेवासा
नेवासा फाटा – नेवासा येथील कॉलेज परिसरातील ओमशांती नगर येथील प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सेवा केंद्राच्या परमज्योती भवनाचे उद्घाटन राजस्थान ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय माउंटआबू येथील संतोषी दिदीजी यांच्या हस्ते करण्यात आले. परमज्योती भवन सेवाकेंद्र मनुष्य जीवाचे परिवर्तन करणारे केंद्र ठरेल असा शुभार्शीवाद राजयोगिनी संतोषी दिदी यांनी दिला.
याप्रसंगी सुनंदा दिदी, उषा दिदी, वरिष्ठ राजयोगी ब्रम्हकुमार दशरथ भाईजी, राजस्थान येथील ब्रम्हकुमार बाबा भाईजी, नागेश बाबा ( साई मर्म चिकित्सा) माउंटआबू येथील महेश भाई, मध्यमेश्वर देवस्थान चे महंत बालयोगी श्री ऋषिनाथ महाराज, मुकाई आश्रमाचे महंत गोपालानंदगिरी महाराज, रामायणाचार्य ज्ञानेश्वर महाराज तांबे, रत्नमाला विठ्ठलराव लंघे पाटील, राजयोगिनी सरला दिदी, राजयोगिनी वंदना दिदी, यावेळी व्यासपिठावर उपस्थित होते.
मान्यवरांचे परमज्योती भवन सेवा केंद्राच्या प्रमुख राजयोगिनी सरला दिदी व राजयोगिनी वंदना दिदी यांनी स्वागत केले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थिती राजयोगिनी संतोषी दिदी यांच्या हस्ते शिवध्वजाचे पूजन करून त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. नेवासा तीर्थक्षेत्राच्या वैभवात भर घालणार्या परमज्योती भवन या ओमशांती सेवा केंद्राचे उद्घाटन कोनशिलेचे अनावरण करून करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी कु. सृष्टी विजय साळुंके हिचे शिव आराधनेवर आधारित भव्य असे भरतनाट्यम् नृत्य सादर झाले. मीरा सोसायटीच्या संचालिका नलिनी दिदी यांनी प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन शारदा दिदी यांनी केले. यानिमित्ताने आमदार श्री विठ्ठलराव लंघे पाटील, महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी भेट देऊन परमज्योती सेवाकेंद्रास शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी वासंती दिदीजी (नाशिक) , करूणा दिदीजी (भोसरी)संगिता दिदीजी (नारायण गाव) अर्चना दिदीजी (परभणी), स्वाती दिदीजी( नांदेड) अर्चना दिदीजी (शिरूर) ॲड. लता दिदीजी (नगर), लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास गोल्हार,माजी सभापती किशोर जोजार,मुकिंदपूरचे सतीष निपूंगे, सुरेश नगरचे सरपंच श्री.कल्याणराव उभेदळ,श्री.वसंतराव मुंगसे,देवगडचे संत सेवक, श्री. संभाजीराव पवार, श्री. नवनाथ लष्करे, मोहन शुक्रे यांच्यासह अनेक सेवा केंद्रावरून आलेल्या भाऊबहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



