अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने शाळेसाठी देणगी
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने शाळेसाठी देणगी
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
अलिबाग: (दि १५) सामाजिक बांधिलकी जपत रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडीओग्राफर्स असोसिएशनशी सलग्न असलेल्या अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने आर. सी. एफ. वसाहतीतील आत्मनिर्भर विशेष मुलांच्या शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या 10 प्लास्टिक खुर्च्या देणगी रूपात देण्यात आल्या.
अलिबाग फोटोग्राफर्स असोसिशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. त्याचाच एक भाग म्हणून आत्मनिर्भर मुलांच्या शाळेला आवश्यक असलेल्या खुर्च्या आज शाळेचे सचिव नागेश कुलकर्णी, संचालक हणमंत देसाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता देसाई, रायगड फोटोग्राफर्स असोसिएशन चे उपाध्यक्ष समीर मालोदे, खजिनदार जितेंद्र मेहता, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन चे अध्यक्ष तुषार थळे, उपाध्यक्ष राकेश दर्पे, सचिव विकास पाटील, खजिनदार विवेक पाटील, योगेश सावंत, वैभव शिंदे, सुमित मालोदे, शाळेतील शिक्षक महेंद्र गावंडे, रवी त्रिभुवन, अक्षया जुईकर, प्रियांका पाटील, श्रद्धा घरत सारिका माळी आदी उपस्थित होते.



