जीवन गौरव साहित्य संमेलनात ‘रसमाधुर्य’ चे प्रकाशन
मराठीचे शिलेदार प्रकाशन नागपूर
जीवन गौरव साहित्य संमेलनात ‘रसमाधुर्य’ चे प्रकाशन
जीवन गौरव साहित्य परिवार, महाराष्ट्र राज्य आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साहित्य नगरी , सहकार सांस्कृतिक भवन, आर्णी रोड, यवतमाळ येथे दिनांक २३ मार्च २०२५ रोजी जीवन गौरव साहित्य संमेलन संपन्न होणार असून संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिका, सामाजिक विचारवंत, शिक्षण तज्ञ,मा. प्राध्यापिका डॉ. छायाताई दिलीपराव महाले तर उद्घाटक व्यवस्थापक शिवशक्ती शिक्षण संस्था वेणी कोठा मा. प्राध्यापक डॉ. बाळासाहेब धांडे तसेच विशेष अतिथी म्हणून मराठी सिने अभिनेत्री झी मराठी फेम ‘माझ्या जीवाची होतिया काहीली’ मा. प्रतीक्षा शिवणकर साळुंखे असणार आहेत.
या संमेलनात महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यातील कवी, लेखक सहभागी होणार असून साहित्य संमेलनाच्या संयोजिका मा.कल्याणीताई मादेशवार यांनी सांगितलेले आहे.
साहित्य संमेलनातील तिसऱ्या सत्रात कविता शिरभाते लिखित ‘रसमाधुर्य’ हा समीक्षात्मक ग्रंथ सन्माननीय अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे.
या पुस्तकाला डॉ. सतपाल सोवळे यांची प्रस्तावना तर डॉ.छायाताई महाले यांचे ब्लर लाभलेले आहे . तसेच गजानन वाघमारे सुप्रसिद्ध गझलकार , मा. मंगेशजी देशपांडे गटशिक्षणाधिकारी, पं.स.नेर , सखी निशा डांगे( सुप्रसिद्ध साहित्यिका ) यांच्या शुभेच्छा लाभलेल्या आहेत.
मराठी साहित्य संपदेत अनमोल भर टाकणाऱ्या ‘रसमाधुर्य’ या समीक्षात्मक ग्रंथाला माझ्या सर्व सहकारी बंधू-भगिनी, माझे आप्तेष्ट, स्वकीय, माझे साहित्य क्षेत्रातील मित्र -मैत्रिणी भरभरून प्रतिसाद देतील अशी आशा बाळगते.
हा ग्रंथ नक्कीच वाचकांच्या पसंतीस पडेल याची खात्री आहे.
आपलीच
कविता सव्वालाखे शिरभाते
यवतमाळ





