दिवाळी अंक “साहित्यगंध दीपोत्सव २०२५” साठी दि १५ पर्यंत साहित्य पाठविण्याचे आवाहन

दिवाळी अंक “साहित्यगंध दीपोत्सव २०२५” साठी साहित्य पाठविण्याचे आवाहन
मराठीचे शिलेदार बहुद्देशीय व प्रकाशन संस्था, नागपूर ‘मराठी भाषा व साहित्य क्षेत्रात’ मागील दहा वर्षापासून सातत्याने आपले अमूल्य योगदान देत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही ‘साहित्यगंध दीपोत्सव २०२५’ दिवाळी अंक बहुरंगी, आकर्षक व डिजीटल स्वरूपात प्रकाशित करणार आहे. संस्थेच्या आजीवन व वार्षिक सभासदांच्या (दोन) साहित्यास या अंकात प्राधान्य देण्यात येणार आहे. तरी इच्छुक सभासदांनी ‘दीपोत्सव २०२५’ साठी खालील संपादकीय टीमकडे दिनांक १५/१०/२०२५ पर्यंत साहित्य पाठवावे.
१) कवी, कवयित्रींना फक्त कविता पाठवायची असल्यास एक स्वरचित कविता व कोणत्याही रचनेचे सर्वोत्कृष्ट पोस्टर पाठवावे.
२) कवी, कवयित्री, लेखक, लेखिका यांनी एक स्वरचित कविता व एक लेख पाठवावा.
३) संस्थेचे सभासद नसलेल्या साहित्यिकांनी किमान वार्षिक सभासद नोंदणी भरूनच साहित्य पाठवावे.
४) लेखक, लेखिका यांसाठी लेखाची शब्द मर्यादा ७०० शब्दापर्यंत असेल. लेख असल्यास एक लेख व सोबत एक कविता किंवा पोस्टर यापैकी कोणतेही एक पाठवावे.
५) अंकासाठी प्रसिद्ध व्यक्तीची मुलाखत, ललित, स्फूट लेखन, काव्यपरीक्षण, कथा, शैक्षणिक अनुभव, शैक्षणिक प्रवास, पुस्तक परीक्षण, काव्यसंग्रह समीक्षण, नाट्य समीक्षा, चित्रपट समीक्षा, माझा काव्यप्रवास, क्रीडा समीक्षण, मला आवडलेले पुस्तक तसेच वार्तापत्र या विषयावर लेखन पाठवावे.
६) दीपोत्सव अंकात कौटुंबिक फोटोसह शुभेच्छा प्रकाशित करण्यात येईल. अत्यल्प शुल्क रू १०० असेल.
८) मराठीचे शिलेदार संस्थेच्या आजीवन व वार्षिक सभासदांना नाममात्र शुल्क रू १०० रू आकारण्यात येत आहे. शुल्क व दोन साहित्य एकदाच पाठवावे.
९) संस्थेचे सभासद नोंदणी शुल्क व दीपोत्सव अंक सहभागी शुल्क भरून मुख्य संपादक व संस्थापक राहुल पाटील, नागपूर यांना या क्रमांकावर 7385363088 पावतीचा स्क्रीन शॉट पाठवावा.
खालील खात्यावर नोंदणी शुल्क जमा करावे.
मराठीचे शिलेदार पब्लिकेशन ता.हिंगणा, जि. नागपूर
मराठीचे शिलेदार पब्लिकेशन,नागपूर
खाते क्र 923020003169683
FSC UTIB0001239
फोन न. 9834739798
(फोन पे किंवा गुगल पे साठी फोन न 9834739798)
दीपोत्सव साहित्य पाठविण्यासाठी संपादकीय टीम:
१) पल्लवी पाटील, निवासी संपादक
२) सविता पाटील ठाकरे, मुख्य कार्यकारी संपादक
३) स्वाती मराडे, मुख्य सहसंपादक
४) विष्णू संकपाळ, सहसंपादक
५) राहुल पाटील, प्रबंध संपादक
मुख्य संपादक व संस्थापक
राहुल पाटील, नागपूर
7385363088 व 9834739798
========



