पुन्हा रफी होणार नाही’; डाॅ.मधुसूदन घाणेकर
‘पुन्हा रफी होणार नाही’; डाॅ.मधुसूदन घाणेकर
वसुधा नाईक,पुणे प्सतिनिधी
पुणे: “चित्रपट गीत रसिकांच्या गळ्यातला ताईत असलेल्या स्व.मोहम्मद रफी यांनी आपल्या मधुर आवाजाने अक्षरशः वेड लावले. रफीजींनी विशेषतः प्रेमगीतं सादर करुन गेल्या संपूर्ण शतकावर प्रभाव टाकला. भारत भूषण, दिलीपकुमार,अशोककुमार , शम्मीकपूर, देव आनंद , प्रदीपकुमार , जाॅय मुखर्जी, जाॅनी वाॅकर, बलराज सहानी, गुरुदत्त, सुनीलदत्त, सुशीलकुमार, सुधीरकुमार, जगदीप, धर्मेंद्र, राजकुमार,राजेन्द्रकुमार, शशीकपूर , जितेंद्र, मनोजकुमार, संजीवकुमार, विनोद खन्ना , राजेश खन्ना,ॠषीकपूर अमिताभ आदि अनेक अभिनेत्यांना पडद्यावर आवाज दिला.
रफीसाहेबांनी आपल्या 40 वर्षाच्या कारकीर्दीत गायलेली शेकडो गाणी अजरामर ठरली आहेत. मन तडपत हरि दर्शन, जाने वो कैसे, सुहानी रात ढल चुकी,ओ दुनियाके रखवाले , मनरे तू काहे न , मधुबनमें राधिका, चौदहवी का चाॅद हो, जो वादा किया वो, सौ साल पहले, चले उड जारे पंछी,खोया खोया चाॅद, अभी न जाओ छोडकर , दिल दिया दर्द लिया, जानेवाले जरा होशियार, चाहे कोई मुझे जंगली कहे, बहारो फूल बरसाओ, पत्थरके सनम, मस्त बहारो आशिक हूॅ , हो आज मौसम बडा, एक हॅसी शामको, तुझको पुकारे मेरा प्यार , गुलाबी ऑखे, दर्दे दिल दर्दे जिगर , तेरी बिंदीयारे, …अशी एकाहून एक सरस गाणी अजुनही ओठावर आहेत.रफीजींनी रसिकांमधील दर्दम्य आशावाद समृध्द केला. आपल्या प्रेमगीतातून रसिकांच्या जगण्याला सौंदर्यवादी दृष्टिकोन दिला. सी रामचंद्र,नौशाद, रोशन, एस.डी.बर्मन, ओ.पी.नय्यर शंकर जयकिशन,कल्याणजी आनंदजी, मदनमोहन,रवी लक्ष्मीकांत प्यारेलाल,आर.डी बर्मन आदि संगीतकारांनी रफीजींच्या गाण्यांचे सोने केले.
शकील बदायूनी, हसरत जयपुरी, साहिर लुधियानी, अनजान, शैलेंद्र, राजेन्द कृष्ण कैफी आझमी, नीरज आदि गीतकारांनी लिहिलेली गीतं मोहम्मद रफी यांनी थेट रसिकांच्या ह्रदयात प्रभावीपणे पोचवली. असा मधाळ आवाज असलेला रफी पुन्हा होणे नाही, पुन्हा होणे नाही ” या शब्दात आंतरराष्ट्रीय कीर्तिचे कलावंत आणि तितिक्षा इंटरनॅशनल मोहम्मद रफी जन्मशताब्दी पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ गायक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी मोहम्मद रफीजींच्या स्वरमय जीवनपटावर प्रकाशझोत टाकताना अत्यंत भावुकतेने प्रतिपादन केले.
वसुधा इंटरनॅशनल संस्थेतर्फे नुकतीच रफीजींच्या जन्मशताब्दी निमित्त नुकतीच एक आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘ फिर रफी ‘ गाण्यांची स्पर्धा घेतली होती.या स्पर्धेचे परिक्षण डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी करुन विजेत्यांना पुरस्काराची सन्मानपत्र॔ प्रदान करण्याच्या निमित्ताने डाॅ.घाणेकर रफीजींच्या दैदीप्यमान कारकिर्दीचा आढावा घेत होते. वसुधा इंटरनॅशनलच्या अध्यक्ष सौ.वसुधा नाईक यांनी सदर स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला, 468 रफीप्रेमींनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला आणि त्यातील 21 विजेत्यांना डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते आंतरराष्ट्रीय पुरस्काराची सन्मानपत्रं वितरीत करण्यात आली असल्याचे वसुधा नाईक यांनी कळवले आहे.
स्पर्धेतील प्रथम पुरस्काराचे मानकरी सौ.लता म्हात्रे, पेण (गायिका गट) आणि आनंद विश्वब्राम्हण , गोवा ( गायक गट) या विजेत्यांनी स्पर्धेतील यशाबद्दल
रसिकांबाबत विशेष कृतज्ञता व्यक्त केली. स्पर्धेतील 22 विजेत्यांना ‘ वसुधा इंटरनॅशनल म्युझिकल ॲवाॅर्डने
सन्मानित करण्यात आले.



