‘मराठीचे शिलेदार’ समूहाप्रती आभारीय शब्दसुमने; प्रतिमा नंदेश्वर
शब्दसुमनांजली

‘मराठीचे शिलेदार’ समूहाप्रती आभारीय शब्दसुमने; प्रतिमा नंदेश्वर
आज सकाळीच ‘तुमचा फोटो पाठवा’ हा आ. राहुल सरांचा सुखद अनुभूती देणारा जादुई मॅसेज होता. बघताच मन सुखावून गेले. मी लगेच फोटो पाठवला. परीक्षकांना माझी रचना भावली आणि माझ्या हायकू काव्यरचनेला सर्वोत्कृष्ट सन्मान मिळाला. हा सन्मान माझ्यासाठी एक प्रेरणा आहे अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण सुध्दा आहे.
‘हायकू’ सारख्या तीन ओळींच्या छोट्याशा पण अर्थपूर्ण काव्यप्रकाराला बक्षीस मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे.हा सन्मान माझ्या लेखणीला निश्चितच बळ देईल.आ.राहुल सर व हायकू मुख्य परीक्षक टिमचे मी मनपूर्वक आभार मानते.
हायकू सारख्या तीन ओळीच्या छोट्याशा कवितेत फक्त चित्र बघून आपल्या भावना, विचार,अनुभव कसे मांडायचे जास्तीत जास्त अर्थपूर्ण हायकू रचना कशी लिहायची हे आ.विष्णू दादांच्या हायकू परीक्षणीय उत्तम मार्गदर्शनातून, प्रोत्साहनातून आपण शिकलो. रोजच दादा, ताईंच्या साध्या, सोप्या आणि मनाला भिडणाऱ्या सुंदर रचना समूहात येत असतात. आणि त्या रचना वाचनाचा आस्वाद पण आपण घेत असतो.आ.राहुल सरांच्या कल्पकतेमुळे त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून देऊन लिखाणास संधी दिल्यामुळेच हे सर्व शक्य झाले.कवितेचे विविध प्रकार शिलेदार समूहातच शिकायला मिळाले.
खूप दिवसाने मी काल हायकू काव्य रचना लिहिली आणि त्याच रचनेला सर्वोत्कृष्ट सन्मान मिळाला माझा गौरव केला मला खूप खूप आनंद झाला..समूहाचे आधारवड मुख्य प्रशासक, संपादक सस्थाप्रमुख आ. राहुल सर, मुख्य परीक्षक आ विष्णू दादा,प्रशासक आ. पल्लवी ताई,आ सविताताई, सहप्रशासक आ. वृंदाताई, आ. स्वातीताई, आ. तारकाताई,आ शर्मिलाताई, आ प्रशांत दादा, आ. संग्राम दादा, आ. लांडगे दादा, आ. उरकुडे सर सर्व प्रशासकीय टिमचे मनस्वी आभार. माझ्यावर शाब्दिक अभिनंदनाचा वर्षाव करणाऱ्या नेहमी लेखणास प्रेरणा देणाऱ्या समूहातील प्रिय दादा, ताईंचे मनपूर्वक धन्यवाद.
कवयित्री सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर
सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



