पद्माकर वाघरूळकर यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर सन्मान जाहीर
साहित्यिक, भाषा शिक्षक, पत्रकार वाघरूळकर यांचा ६ रोजी सत्कार
पद्माकर वाघरूळकर यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर सन्मान जाहीर
साहित्यिक, भाषा शिक्षक, पत्रकार वाघरूळकर यांचा ६ रोजी सत्कार
जनजागृती सेवा संस्था बदलापूर, ठाणे तर्फे होणार सत्कार
पद्माकर वाघरूळकर, प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर दि.१ (प्रतिनिधी)- सुप्रसिद्ध साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार आणि श्री सरस्वती भुवन शिक्षणसंस्था छत्रपती संभाजीनगरच्या बालानगर शाखेचे ज्येष्ठ भाषा व सामाजिकशास्त्र शिक्षक पद्माकर दत्तात्रय वाघरूळकर यांना जनजागृती सेवा संस्था बदलापूर, ठाणे यांच्यावतीने पत्रकारिता व साहित्यिक योगदानाबद्दल दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मानाने दर्पणदिनी ६ जानेवारी २०२६ रोजी सन्मानित करण्यात येत आहे, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरूनाथ तिरपणकर, सचिव संचिता भंडारी यांनी कळविले आहे.
पद्माकर वाघरूळकर यांच्या या पुरस्काराबद्दल श्री सरस्वती भुवन शिक्षणसंस्था छत्रपती संभाजीनगरचे सरचिटणीस सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्रीरंग देशपांडे, श्री स.भु.प्र. बालानगर शाखेचे मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड,स्थानिक शालेय समिती अध्यक्ष सत्यनारायणजी सोनी यांच्यासह सर्व शाखासभासद व समिती सदस्य, पंचक्रोशीतील नागरिकांनी तसेच सर्वच विद्यार्थी, फेरोज पटेल, सुधाकर येवतीकर या शिक्षकशिक्षकेतर सहकारी, पत्रकार बंधू,आप्तेष्ट व अनेक सुहृदयांनी कौतुकासह अभिनंदन केले.



