0
4
8
2
9
3
आई वडील
प्रेम प्रेयसी गुलाब
चंद्र तारे काही नको मला
मला जगण्याचं थोड ग्यान याव
आई वडिलांच्या काठीचा मी आता आधार व्हावा
पैसा अडका धन दौलत
असलं काही नको मला
हातुन माझ्या काही चांगलं घडून जावं
आईवडिलांच्या आनंदाचं मी एक कारण व्हावं
स्वर्ग नर्क पाप पुणे
इथेच माझं सारं सार व्हाव
आई-वडिलांच्या सेवेमध्येच
माझं ईथे चारधाम व्हावं
आयुष्यभर राबलेल्या आई-वडिलांचं
रोज रात्री स्मरण व्हाव
थरथरणाऱ्या हाताची काठी
धूसर झालेल्या डोळ्यांची मी नजर व्हाव
देव धर्म पूजा अर्चा
जन्म पुनर्जन्म माहीत नाही मला
तसं असेलतर देवान माझ मागन लक्षात घ्यावं
पुढच्या जन्मी हेच आई वडील निसर्गान मला पुन्हा परत द्याव
कवी प्रकाश पुंडलिक गोधने
बाचोटी ता.कंधार,जि.नांदेड
====
0
4
8
2
9
3



