0
4
8
2
8
7
सौदामिनी
गृहकृतदक्ष आजची नारी
स्वकर्तृत्वाची झेप गगनी
आदिमाया आदिशक्ती तू
तूच अहिल्या, तारा, राणी…!!१!!
नको बनू तू सोशिक फार
धारदार कर प्रसंगी वाणी
सावित्रीची वारसदार तूच
स्वयंदीप तूच ज्ञानदायीनी !!२!!
स्वअस्तित्वाचा लढा तुझा
कायम ठेव तुझ्या जीवनी
बाळ घेऊन पाठीवरती
कशी लढली लक्ष्मी राणी…!!३!!
नको घाबरू गिधाडांना तू
आग दिसावी तुझ्या नयनी
स्वरक्षणास बनावे कधी तू
त्रिशूलधारी महिषासूरमर्दीनी..!!४!!
तलवारीपरि तुला पाहताच
संकटानी धूम ठोकावी वनी
कंप सुटावा दुष्ट दुर्योधनाला
रौद्ररूप जशी तू सौदामिनी…!!५!!
राजश्री मिसाळ ढाकणे
जिल्हा बीड
=======
0
4
8
2
8
7



