
0
5
3
4
0
0
बे पाचे दहा
गणू काही नको म्हणू
अंकलिपी हातात धर
बे एक चे पाढे पाठ कर
नाही तर घराचा रस्ता धर
तू आलास ना आमच्या घरी
बस आता चूप चाप
आजच्या वाढदिवसाची
चॉकलेट वाली केक काप
खाऊन झाल्यावर
म्हण एका दोनाचे पाढे
चांगला हुशार बन
नाहीतर ओढशील गाडे
बे एक बे , बे दुणे चार
नाहीतर खाशील मार
बे तिरी सहा, बे चौक आठ
कर मस्त पाढे पाठ
हुशार तर होशील
साहेब बनशील
म्हण मग बे पाचे दहा
पुस्तक खोलून पहा
केवलचंद शहारे
सौंदड, जि.गोंदिया
0
5
3
4
0
0



