0
4
8
2
9
7
लिहूया थोडं स्वतःसाठी
काढून थोडा वेळ दररोज
लिहूया थोडं स्वतःसाठी
शब्दा शब्दांची घालुनी सांगड
आवड, छंद ,जोपासण्यासाठी
मनातील विचार जाणूनी
लेखणी घेऊ हातामध्ये
घडलेल्या घटनेवर आपण
विचार मांडू स्वतः मध्ये
संघर्षाशिवाय यश नाही
प्रत्येक वेळेला बरोबर येईल
असे नाही जीवनात कधीही
अपयश सुद्धा धैर्याने पचविल
म्हणून लिहूया थोडे स्वतःसाठी
विषय मात्र आवडीचा राहील
अनुभवाचे बोल लिहिता येतील
विचार करण्यास वेळ मिळेल
सर्व केले सर्वांसाठी
आपणासाठी काहीच केल नाही
चला लेखणी येऊन हातात
स्वतःसाठी काहीतरी लिहित राही
कुसुम पाटील
कसबा बावडा, कोल्हापूर
========
0
4
8
2
9
7



