शिशुविहार” मध्ये महाराष्ट्र दिन साजरा
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
“शिशुविहार” मध्ये महाराष्ट्र दिन साजरा
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलि़बाग तालुका शिक्षण प्रसारक , ” मंडळाच्या “शिशुविहार” प्राथमिक शाळेत महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण , भाषणे , पालक- सभा , भित्तीपत्रक प्रकाशन असे विविध कार्यक्रम आयोजिले होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बळवंत वालेकर होते .
महाराष्ट्र दिनानिमित्त प्रारंभी ध्वजारोहण संस्थाध्यक्ष वाले कर सर यांच्याहस्ते केले गेले . महाराष्ट्र दिन व आँतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त कुमारी तानवी देवेन्द्र बंद्री , कु. आरोही भरत पवार , कु. श्लोक सचिन ताळवी व कु. अर्णव पवार , मुख्याध्यापिका सौ, कल्याणी वैखंडे व सहा. शिक्षिका श्रीमती रुपा कोळी यांची भाषणे झाली तर संस्थाध्यक्ष वालेकर सर यांचे ” पाल्याच्या भवितव्यासाठी पालकांची कर्तव्ये ” या विषयावर भाषण झाले.
सदरवेळी भित्तीपत्रकाचे प्रकाशन प्रमुख अतिथींच्याहस्ते झाले. त्यानंतर पालकांशी चर्चा करण्यात आली. या चर्चेत अनेक पालकांनी सहभाग घेतला.
या राष्ट्रीय कार्यक्रमास संस्थाध्यक्ष बळवंत वालेकर शाळा समिती सभापती जानवी रसाळ , , मुख्याध्यापिका सौ. कल्याणी वेखँडे , सहा. शिक्षिका श्रीम. रुपा कोळी , क. सेविका श्रीम. स्वप्नाली ओव्हाळ तसेच पालक जीविता भगत , रोहिणी शिवलकर , मनीषा चव्हाण , जान्हवी रसाळ , दीपाली कुंडी , प्रांजल , दक्षिता साळुघे , निमा पवार , चैत्राली पेरैकर , रेखा फुलमाळी, रिना भिका , कल्पना सोलर , रेश्मा जाधव , श्रुतिका शिवलकर , विशाल जाधव , नितेश शिलधनकर , सुनिल ठाकूर आणि विद्यार्थी उपस्थित होते . राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली .



