
0
4
0
9
0
3
ऐनेमहाल
नका बघू दिवास्वप्ने
कशी पूर्ण ती होतील
स्वप्ने असावी ध्येयाची
पूर्ण तडीस जातील
ध्येयशून्य स्वप्न जणू
रिते ऐनेमहालच
पाहण्यास ते सुंदर
राहण्यास कठीणच
सागराचा जलसाठा
असे जरी महाकाय
क्षुधा शमविण्यासाठी
नसे त्याकडे पर्याय
सिध्द व्हावे पूर्णत्वास
कार्य पूर्तीचा महाल
नाव होईल सर्वत्र
परि तो ऐनेमहाल
दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)
तुरोरी जि. धाराशिव
=======
0
4
0
9
0
3





