
0
4
8
2
5
1
संशय
संशयाचे बीज रूजले
संसार उध्वस्त झाल
विश्वास जातो मरून
कुटुंबात होतात हाल
वाद विवाद भांडण
उत येतो क्षणो क्षणी
नांदत नाही सुख शांती
अढी असे प्रत्येकाच्या मनी
विश्वास उध्वस्त झाला
कुटुंबात वाढले हेवेदावे
आत्मविश्वास संशय घेऊ
माणुसकीच कायम हरवे
संशय हा नाजूक धागा
मनातील नवीन रोग
खरे काहीच सुचत नाही
म्हणूनच करावे लागेल सोंग
संशय मनातील विचार
आतल्या आत पोकरी
हृदयावरील पडतोय तान
संवादातून उमलेल भूवरी
कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
===========
0
4
8
2
5
1



