बुटीबोरी ATM फोडी प्रकरणातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद
शहर प्रतिनिधी, अखिल रोडे
बुटीबोरी ATM फोडी प्रकरणातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद
एकूण ७ आरोपी सह मुद्देमाल पोलिसांचा ताब्यात
शहर प्रतिनिधी, अखिल रोडे
नागपूर/बुटीबोरी: (दि.3): येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास ATM फोडून चोरीच्या गुन्ह्यांचे अनुषंगाने आरोपींचा तांत्रिक पध्दतीने व गुप्त बातमीदाराकडून शोध घेत असतांना संशयित इसमांबद्दल महिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून रुईखॆरी छोटीबोरी येथेन 4 आरोपी व हनुमान नगर बुटीबोरी येथुन 2 आरोपी व तसेच एक विधी संघर्षग्रस्त बालक असे एकुण 07 आरोपींना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या मोटर सायकल जप्त करीत पो.स्टे एम आय.डी.सी बोरी. जिल्हा नागपूर ग्रामीण येथील गुन्हा क्र ५४५/२४ कलम ३०३(२),६२,३२४(४),३(५) बि एन एस अन्वये नोंद गुन्हा उघडकीस आला आहे.
*आरोपी यांचे नाव व पत्ता*
▶️ नाव आरोपी – 1. राजेश रमेश झोटिंग वय २२ वर्ष रा. मंगेश ठाकरे यांच्या घरी भाड्याने , छोटी बोरी ता. जिल्हा नागपूर
2. करण बाबूलाल कुंभारे वय 19 वर्षे, रा. बिरसा मुंडा चौक रुईखेरी, तालुका जिल्हा नागपूर
3. हिरालाल केशव परीहर वय २२ वर्षे रा. वार्ड नंबर १, छोटी बोरी ता जिल्हा नागपूर.
4. रोशन भॆय्यालाल साखरकर वय २५ वर्ष रा हनुमान नगर बुटीबोरी ता जि नागपुर
5. विक्की शिवदास बावने वय १९ वर्ष रा हनुमान नगर बुटीबोरी ता जि नागपुर
6. वरुण दिपक बिस्वास वय २१ वर्ष रा रुईखॆरी ता जि नागपुर
*7. एक विधिसंघर्षग्रस्त बालक*
*पाहिजे आरोपी:-*
१) संदिप कापसे रा चिमुर जि चंद्रपुर,
२) जयदिप वर्मा रा छोटीबोरी ता जि नागपुर
▶️ *जप्त मुद्देमाल*
1) MH 40 CE 6733 स्प्लेडर किंअं 70,000/-₹
2) MH 40 SR 8600 स्प्लेडर किंअं 50,000/-₹
3)MH 40 CR 5735 पल्सर किंअं 1,00,000/-₹
4) एकुण चार मोबाईल वेगवेगळ्या कंपनीचे किंअं 40,000/-₹
5) एक लोखंडी सब्बल किंअं 500/-₹
असा एकुण 2,60,500/-₹ चा माल
▶️ *उघडकीस आलेला गुन्हे*
1) पोलीस ठाणे MIDC बोरी अप. क्र. 545/24 कलम 303(2),62,324(4),3(5) BNS
सर्व आरोपींची वैद्यकिय तपासणी करुन जप्त मुद्देमाल व कागदपत्रंसह पोलीस ठाणे MIDC बोरी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
संपूर्ण कार्यवाही नागपूर ग्रामीण पोलिस अधिक्षक हर्ष पोतद्दार यांचा मार्गदर्शनात स्थानिक गून्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. ओमप्रकाश कोकाटे, सहा. पोलीस निरिक्षक किशोर शेरकी, सागर गोमासे, मनोज गदादे, जिवन राजगुरु सफौ मिलिंद नांदुरकर, पोहवा/ विष्णु जायभाये, नारायण राठोड, इकबाल शेख, अमृत किनगे, रोहन डाखोरे, प्रमोद भोयर, पोना संजय भरोडिया, देवा देवकात्ते, सतीश राठोड, चपोकाॅ आशुतोष लांजेवार , चापोका संघापल मेश्राम यांनी पार पाडली.