इटियाडोह धरणानेही ओलांडली नुकतीच धोक्याची पातळी
संततधार...प्राणवाहिनीमुळे प्राण संकटात.!
संततधार…प्राणवाहिनीमुळे प्राण संकटात.!
इटियाडोह धरणानेही ओलांडली नुकतीच धोक्याची पातळी
जिल्हा प्रतिनिधी तारका रुखमोडे. अर्जुनी मोर गोंदिया
अर्जुनी/मोर: तालुक्याचे वैभव असलेला व ऐतिहासिक इटियाडोह धरण. तिथून वाहणारी गाढवी नदी ही मुसळधार पावसामुळे पूर्ण दुथडी भरून वाहत आहे.नदीच्या खालच्या भागात तथा पात्रासमीप वसलेले दिनकर नगर ,केशोरी असे अनेक गावं आहेत. दिनकरनगर या गावात संतत धारेमुळे पाणी घुसले आहे व काही संसार त्यात उघड्यावर पडलेले आहेत.
गेल्या बारा तासात पावसाचा कहर इतका वाढलेला की प्राणवाहिनीमुळे प्राण्यांनाही झाडावर आश्रय घ्यावा लागत आहे या पुरात बारा ते तेरा घरे डुबलेली आहेत.तरी नदीपात्रातील सर्व नागरिकांना सतर्कतेच्या इशारा प्रशासनातर्फे देण्यात आलेला आहे.
आज दुपारी 12.00 वाजता इटियाडोह धरण 74.09 % भरलेला असून आजची जलाशय पातळी : 254.12 मी. आजचा उपयुक्त पाणीसाठा : 235.53 दलघमी आहे. पण धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व धरणावर सतत पाऊस सुरू असल्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत असल्यामुळे धरण ओव्हरफ्लो होण्याची पण शक्यता आहे. तरी नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवा-गमन करणाऱ्या सर्व संबंधीतानी स्वतः ची काळजी बाळगावी असा सतर्कतेचा ईशारा पूर नियंत्रण कक्षाने दिलेला आहे.





