
0
4
8
2
5
1
व्हेलेंटाईन
व्हेलेंटाईन दिनू येता..
मनी फुलले गुलाब जर्द
झंकारला केशर देह
किणकिणले कर कंकण
छुमक छुमक थिरकले
नाजूक पदी पैंजण
मोहरला कटी कमरबंद
शहारला हा बाजूबंद
भुरभुरले अलवार कुंतल
छेडे मज वाराही शिंदळ
भरीले मी काजळ नेत्री
केला शृंगार पुन्हा लक्षी
सजला भावनेचा किनारा
वसंतापरि व्हेलेंटाईन आला
अनुराग नखशिखांत न्हाला
झाला सोहळा प्रीतीचा
नुरले हृदयातील अंतर
राहू जवळ सदा निरंतर
प्रा.तारका रुखमोडे
अर्जुनी जि.गोंदिया
=========
0
4
8
2
5
1



