आवास [ भगत आळी ] मध्ये श्री काळभैरव जयंतीचा सोहळा उत्साहात संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

आवास [ भगत आळी ] मध्ये श्री काळभैरव जयंतीचा सोहळा उत्साहात संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेप्रमाणे यावर्षीही आवास गावातील भगत आळी येथील काळभैरव मंदिरात आवास [ भगत आळी ] ग्रामस्थांच्या आयोजनातून बुधवार दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी काळभैरव जयंतीचा सोहळा उत्साहात संपन्न झाला.
सर्व प्रथम मंदिरातील काळभैरवाच्या मूर्तीला अभिषेक घालून विधीवत पूजा करण्यात आली. मंदिरात श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.
श्री काळभैरव पूजा विधी व सत्यनारायण पूजेला सुमित श्रीराम भगत व साजिरी सुमित भगत हे दांपत्य बसले होते. श्री काळभैरव अभिषेक, पूजा विधी, श्री सत्यनारायण पूजा विधी, मंत्रोच्चार व पोथी वाचन पंकज पाठक या ब्राह्मणांनी केले. श्री काळभैरव जयंती सोहळ्याच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सुंदर सजावट करण्यात आली होती तसेच मंदिराच्या आजू – बाजूच्या परिसराची साफसफाई करण्यात आली होती.
या सोहळ्याच्या निमित्तानं दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. असंख्य भाविकांनी श्री काळभैरव व श्री सत्यनारायणाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी ठीक ६ .३० वाजता श्री काळभैरव प्रासादिक संगीत भजन मंडळ, आवास [ भगत आळी ] यांचा अतिशय सुश्राव्य असा संगीत भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या भजनामधील मुख्य गायक दयानंद दत्तात्रेय भगत, तबला व पखवाज वादक अभिनव दयानंद भगत तसेच सर्व सहगायकांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. श्री काळभैरव जयंतीचा सोहळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी आवास भगत आळीतील सर्व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.





