Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजन

आवासमध्ये वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचा शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव दिन उत्साहात संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 9 0

आवासमध्ये वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचा शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव दिन उत्साहात संपन्न

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजन

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग (दि १६) :वंदेमातरम् हे गीत म्हणजे भारताच्या आत्म्याचा तेजस्वी महामंत्र. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं वंदे मातरम् हे गीत भारताच्या राष्ट्रीय स्वाभिमानाचं प्रतीक ठरलं. स्वातंत्र्यलढ्यात या गीताने लाखो भारतीयांना प्रेरणा दिली आणि एकतेचा अद्वितीय संदेश दिला.

आज १५० वर्षांनंतरही या राष्ट्रीय गीताचं तेज अखंड आहे कारण ते भारतीय संस्कृती, आत्मविश्वास आणि प्रगतीचं प्रतिबिंब आहे. वंदेमातरम् या गीताने अनेक पिढ्यांना देशसेवेचं बळ दिलं आणि भारताला नव्या युगाच्या दिशेने पुढे नेलं.

शुक्रवार दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचा शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी दिन मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या सुनियोजनातून व मार्गदर्शनातून उत्साहात संपन्न झाला.

सर्व प्रथम सांस्कृतिक समिती प्रमुख धनंजय भगत सर यांनी वंदेमातरम् या राष्ट्रीय गीता विषयी विद्यार्थ्यांना आतिशय सुंदर अशी माहीती सांगितली. त्यानंतर विशाल पाटील सर यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी वंदेमातरम् या राष्ट्रीय गीताचे सामुहीक गायन केले व गायनाला विशाल पाटील सर यांनी संवादिनीची साथ केली. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे