कास्ट्राईब शिक्षक संघटनेची राज्यस्तरीय शिक्षण परिषद व सर्व साधारण सभा उत्साहात
परभणी जिल्ह्यातील २४ गुरूजनवर्ग आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
कास्ट्राईब शिक्षक संघटनेची राज्यस्तरीय शिक्षण परिषद व सर्व साधारण सभा उत्साहात
राज्यस्तरीय सर्वसाधारण सभेत विविध ठराव मंजूर
परभणी जिल्ह्यातील २४ गुरूजनवर्ग आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
जिल्हा प्रतिनिधी परभणी व मुख्य संपादक
बिनधास्त न्यूज नेटवर्क
परभणी: कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र रजिस्टर नं 5701संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा व शिक्षण परिषद , शिवाजी लॉ कॉलेज परिसर. परभणी येथे रविवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 पार पडला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. डॉ. राहुल पाटील आमदार परभणी, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.बी.डी धुरंधर, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. श्री नितीन चंदनशिवे प्रसिद्ध कवी सांगली, उपशिक्षणाधिकारी मा.शौकत पठाण, माजी उपसंचालक मा.सुधीर बानाटे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष मा.गणेश मडावी, वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगड, मुख्य संघटक मा. राजाराम इंदवे, अतिरिक्त सरचिटणीस अशोक गोडबोले, कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्यचे सरचिटणीस मा. सतीशजी कांबळे, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार जाधव, मुख्य संघटन सचिव परशराम गोंडाणे, राज्य प्रसिद्धी प्रमुख राहुल पाटील, डॉ सुभाष गायकवाड आदी मान्यवर पदाधिकारी सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, महासंघाचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत भव्य दिव्य स्वरूपात पार पडला यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात परभणी जिल्ह्यातील एकूण २४ आदरणीय गुरुजनांचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिराव फुले आदर्श पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. संघटन अधिक मजबूत व्हावे याकरिता विविध ठराव वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार जाधव यांनी मांडले व ते सर्वानुमते मंजूर कण्यात आले.
त्याचप्रमाणे मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण, मागासवर्गीय सरळसेवा भरती अनुशेष, मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती वाढ करणे, कंत्राटी भरती धोरण रद्द करणे, संचमान्यता जि आर रद्द करणे,घरभाडे भत्ता मुख्यालय अट काढून टाकणे, जुनी पेन्शन योजना लागू करा, कॅशलेश विमा योजना सुरु करणे आदी महत्वाचे ठराव मांडून त्या बाबत पुढील काळात लोकशाही मार्गाने शासनाशी चर्चा करून, प्रसंगी आंदोलन करून सोडविण्याचा निग्रह यावेळी करण्यात आला. विशेष करून मा.सतीश कांबळे सर व परभणी जिल्हा कार्यकारणीचे विशेष आभार व अभिनंदन