0
4
0
9
0
3
प्रेमाने होत आहे रे
प्रेमाने होत आहे रे
प्रथम प्रेमाने बोला
सर्वासम प्रेमाने वागा
भेद ठेवा बाजुला!!१!!
सदा नम्र रहा रे
स्वतःचे नम्रपण जपा
जिभेवर नियंत्रण ठेवा
जगतास वाटेल हेवा!!२!!
वर्तनातून संस्कार रे
समोरच्याला सन्मान दया
रागाला जरा आवरा
नको होऊ कावरा बावरा!!३!!
सामाजिक कार्य करा रे
जिभेवर खडीसाखर फिरवू
दुष्मणाची गोड बोलून जिरवू
सारे स्वाभिमानाने जगू !!४!!
परंपरा आपली जपू रे
वाईट रूढी खोडू
विरोधकांना सारे नडू
जातीयता आपण सोडू
सुरेखा रावसाहेब चित्ते कांबळे
श्रीवर्धन जि. रायगड
=========
0
4
0
9
0
3





