0
4
0
9
0
3
ये रे श्रावणा
दिवसा मागून येतात दिवस
जातात मोठ्या वेगाने
बळीराजा आता सुखावला
रिमझिम केली सुरवात पावसाने
सृष्टी वलय बहरली
दिसू लागली प्रफुलित
पशु पक्षांची भागली तहान
लागले राहू सारे आनंदित
ये रे श्रावण आता
कर धरणी मातेचा समाधान
सुखावनार आता बळीराजा
वाढणार रे तुझा मान
ये रे श्रावणा कर कृपा
मांगल्य मांगल्य नांदु दे
दे आशीर्वाद तू सर्वांना
सुख समृद्धी तू नांदू दे
लपंडावचा खेळ आता
खेळू नकोस रे आता माझ्याशी
बहरू दे सृष्टी वलय
साठ गाठ कर बाळाशी
केवलचंद शहारे
सौंदड गोंदिया
===≠====
0
4
0
9
0
3





