‘मराठी हीच आपली मातृभाषा आहे व मराठीतून शिकाल तरच टिकाल’
सचिव, नरेश शेळके यशवंतराव चव्हाण सेंटर बुलढाणा यांचे प्रतिपादन
‘मराठी हीच आपली मातृभाषा आहे व मराठीतून शिकाल तरच टिकाल’
सचिव, नरेश शेळके यशवंतराव चव्हाण सेंटर बुलढाणा यांचे प्रतिपादन
मराठीचे शिलेदार प्रकाशनातर्फे २२ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
जिल्हा प्रतिनिधी, बुलढाणा
बिनधास्त न्यूज नेटवर्क
बुलढाणा: (दि २१) ‘मराठी हीच आपली मातृभाषा आहे व मराठीतून शिकाल तरच टिकाल. माय मराठीच्या सक्षमीकरणासाठी आतातरी सर्वांनी पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सचिव, नरेश शेळके यशवंतराव चव्हाण सेंटर बुलढाणा यांनी केले. ते मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर तर्फे छत्रपती संभाजीनगर येथे (दि ७ मे) आयोजित ‘गौरव मराठी अभिजात २०२५’ या राज्यस्तरीय पुस्तक प्रकाशन व राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेच्या समारंभात मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेने यंदा २२ काव्यसंग्रह प्रकाशित करून मराठी साहित्य क्षेत्रात उच्चांक गाठला आहे. केंद्र शासनाने यंदा आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिला याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले. तसेच मराठीचे शिलेदार संस्थेने आयोजित केलेल्या या समारंभाचे, आयोजन समितीचे व अध्यक्ष संस्थापक राहुल पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले.
मराठीचे शिलेदार’ बहुउद्देशीय संस्था नागपूर तर्फे आयोजित ‘गौरव अभिजात मराठी २०२५’ कार्यक्रमात भव्य दिव्य राज्यस्तरीय पुस्तक प्रकाशन सोहळा व राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद सभागृह छत्रपती संभाजी नगर येथे नुकताच संपन्न झाला. मराठवाड्याचे लोकप्रिय शिक्षक आमदार आदरणीय विक्रम काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्याचे उद्घाटक प्रभारी प्राचार्य डॉ.पद्माताई जाधव वाखुरे होते. सदर कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर बुलढाण्याचे सचिव नरेश शेळके, शिवव्याख्याते डॉ.बालाजी जाधव, शिवव्याख्याते ए.बी.पठाण, मराठीचे शिलेदार समूहाचे विश्वस्त प्रमुख अरविंद उरकुडे ,अशोक लांडगे, ज्येष्ठ कवयित्री साहित्यिका स्वाती मराडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
माय मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर भाषा सक्षमीकरणाच्या उदात्त हेतूने आयोजित या कार्यक्रमाचे आयोजक मराठीचे शिलेदार समूह बहुउद्देशीय संस्था नागपूरचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राहुल सर्व त्यांची प्रशासक टीम होती. छत्रपती संभाजी नगर येथील आयोजन समितीमध्ये डॉ.पद्माताई जाधव, विजय शिर्के, विष्णू संकपाळ,अकील पठाण, वर्षां मोटे व प्रशांत ठाकरे इत्यादी सदस्यांनी मोलाची कामगिरी बजावली.





