मराठी कवितेत इंग्रजी शब्दांचा वापर टाळावा
वसुधा नाईक पुणे प्रतिनिधी

मराठी कवितेत इंग्रजी शब्दांचा वापर टाळावा
वसुधा नाईक पुणे प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
पुणे: (दि २३) काव्ययोग काव्यसंस्था, पुणे आयोजित द्वितीय वर्धापन दिनानिमित्त पहिले राज्यस्तरीय विद्यार्थी कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन सोहळा तसेच निमंत्रित कवींचे कविसंमेलन कात्रज, सुखसागर नगर येथे आयोजित करण्यात आले. संमेलन अतिशय उत्साहवर्धक पार पाडले.
या वेळी कार्यक्रम अध्यक्षा माननीय सौ.ललिता सबनीस (बालसाहित्यिका) , उद्घाटक माननीय प्रा.शरदचंद्र काकडे देशमुख लेखक, एकपात्री कलाकार), स्वागताध्यक्षा सौ.वसुधा नाईक (बालसाहित्यिका) ,प्रमुख पाहुण्या म्हणून इंस्टाग्राम प्रसिद्ध युवा कवयित्री सौ.चैताली कापसे तसेच ज्येष्ठ साहित्यिका मा.श्रीमती सुभा लोंढे ,कवी संमेलन अध्यक्ष युवा कवी माननीय श्री.श्रीशैल सुतार आदी मान्यवर उपस्थितीत होते.
श्रीमती सुभा लोंढे लिखित ‘जंगलाची शाळा’ या किशोर वयीन मुलांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन तसेच कादंबरी ‘गुलामीचं जोखड उतरलं’ ह्या कादंबरीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी तब्बल चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
वेगवेगळ्या गावातून,तालुक्यातून या संमेलनास विद्यार्थी हजर होते.त्यांनी आपल्या बाल मनातून तयार केलेल्या कविता सादर केल्या तसेच रसिक वर्गाची , उपस्थित मान्यवरांची मने जिंकून घेतली. जे विषय कधी आपण मांडले नाहीत तसेच त्यावर लिहिले गेले नाहीत. अश्या विषयावर विद्यार्थ्यानी कविता सादर केल्या.
एकापेक्षा एक अशा कविता सादर केल्या.म्हणजेच काय मुलांची काल्पनिक क्षमता किती आहे हे त्यांच्या कवितेतून समजले.खरं तर काव्ययोग काव्यसंस्था गेली वर्षभर खेड्यापाड्यात,गावपातळीवर असे छोट्या छोट्या विद्यार्थी कवी संमेलनाचे आयोजन करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना संधी मिळते.ह्या कार्यक्रमाचे निवेदन सौ.राजश्री वाणी मराठे यांनी केले. ह्या पहिले राज्यस्तरीय विद्यार्थी कविसंमेलनाचे आयोजन काव्ययोग काव्यसंस्था अध्यक्ष योगेश हरणे, उपाध्यक्ष गौरव पुंडे, सायली ढेबे, पल्लवी पवार, तुषार पालखे यांनी केले.



