Breaking
ब्रेकिंग

अवैद्य बिर्याणी हॉटेल व इतरही अतिक्रमण त्वरित हटविण्याची मागणी

नागपूर शहर प्रतिनीधी

0 5 1 6 4 1

अवैद्य बिर्याणी हॉटेल व इतरही अतिक्रमण त्वरित हटविण्याची मागणी

श्री संत रविदास मंदिराला लागूनच ताज बिर्याणी हॉटेल

नागपूर शहर प्रतिनीधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर: (दि १२) शहरातील दक्षिण नागपूर येथील हनुमान नगरात 50 गरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 60 वर्षापासून अनुदानावर श्री संत रविदास छात्रालय सुरू आहे. यामध्ये श्री संत रविदास महाराजांची मंदिर आहे. मंदिराला लागूनच अवैध्य ताज बिर्याणी सेंटर मध्ये मांसाहारी बिर्याणी व इतर मासाहारी पदार्थाची विक्री केली जाते. अवैध्य ताज बिर्याणी हॉटेल व इतरही अतिक्रमण त्वरित हटविण्याची मागणी आज पत्रपरिषदेत केली.

बिर्याणीवाला या संस्थेचा किरायदार नसून जबरदस्तीने कब्जा करून व्यवसाय करीत आहे. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग होत आहे. आणि हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जात आहे. रोज रात्रीला रहदारी अडथळा ग्राहकांमुळे निर्माण होतो. काही ग्राहक छात्रालय परिसरात शिरून दारू पितात. मास शिजवण्याच्या प्रक्रियेने वायू प्रदूषण आणि ग्राहकांच्या गोंगाटामुळे ध्वनी प्रदूषण होते. त्या सर्व बाबींचा विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होतो.

बिर्याणी मालकाला जाब विचारायला गेल्यास झगडा करून मारहाण करायला तयारच असतो. त्यासाठी मनपा नागपूर सुधार प्रन्यास पोलीस स्टेशन आमदार खासदारांना व मुख्यमंत्र्याकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा अजूनही या कारवाई केली नाही. जर कारवाई न झाल्यास आंदोलन करणार असा इशारा सहसचिव लीलाधर कानोडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला.

यावेळी पत्रकार परिषदेत अध्यक्ष वासुदेव इंगळे, रामदास गुजरकर, सौ. सरोज काटवले, अनिल काटवले, लीलाधर कानोडे, सौ. छाया राजू शेंडे, जगन्नाथ सिरसकर, गोवर्धन बरडे, शारदा शेंडे आणि ईश्वर पवनीकर यांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 4 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे