0
4
8
2
9
4
माझी ताई
माझी ताई….
कधी आई माझी होते
लेकरासारखी माझ्यावर
खूप खूप माया करते
माझी ताई…
आहे खूप खूप हुशार
अभ्यास करून करून
आणते मार्क फार….
माझी ताई….
सांगते युक्तीच्या गोष्टी
तिच्यासोबत राहताना
होत नाही मी दुःखीकष्टी
माझी ताई…
मला आवडते फार
तिला सोडून दूर कधी
नाही होणार मी पसार
वैशाली अंड्रस्कर
चंद्रपूर
=======
0
4
8
2
9
4



