Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

मुख्याध्यापक ‘मोहिते’ सरांचा सेवापूर्ती सोहळा; आठवणींना उजाळा

कु.हर्षिता राहुल पाटील वर्ग ५ वा, वर्गनायिका नेहरू विद्यालय, हिंगणा जि.नागपूर

0 5 1 7 8 7

मुख्याध्यापक ‘मोहिते’ सरांचा सेवापूर्ती सोहळा; आठवणींना उजाळा

नागपूर जिल्ह्यातील सर्वच बाबतीत अग्रगण्य तालुका म्हणून हिंगणा तालुक्याचे नाव विश्वासाने घेतले जाते याचा मला अभिमान आहे. या हिंगणा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात विश्वसनीय काम करणारी शिक्षण संस्था म्हणून, ‘नेहरू विद्यालया’चे नाव घेतले जाते. नेहरू विद्यालय ही माझी शाळा. मी इयत्ता पहिलीपासून याच संस्थेत लहानाची मोठी झाली. संस्कारमय वातावरणात स्वच्छंदपणे बागडता आले. यंदा मी पाचवीत आहे.

मागील आठवड्यात नवा शब्द शालेय सूचनेच्या माध्यमातून कानी पडला ‘सेवापूर्ती’. तसा शब्द नवखा नव्हता, परंतु वडिलांना विचारून एकदा खात्री केली. आणि भाषणासाठी नाव दिले. आमच्या शाळेचे आदर्श मुख्याध्यापक मा. शशीकांत मोहिते सरांचा सेवापूर्ती सोहळा कार्यक्रम असल्याचे समजले. थोडं गहिवरून आलं. घरी जाऊन कसेबसे मोडक्या- तोडक्या शब्दात भाषण लिहिले. बांबाना विचारून दुरूस्त करून अंतिम स्वरूप दिले. दुस-या दिवशी शाळेतील भरगच्च कार्यक्रमात, अर्थात सरांच्या सेवापूर्ती सोहळ्यात मनोगतीय भाषण सादर केले. सर्वांनी कौतुकही केले. परंतु बरेचसे बोलायचे राहून गेल्याची खंत होती. मनाचा, मनाशी अट्टहास करून सरांसाठी पुन्हा लिहावे असे ठरवले. आणि सुटीच्या दिवशी लिहून काढले.. जे आपण मराठी वाचक म्हणून वाचताहेत.

माझ्या शाळेचे मुख्याध्यापक ‘श्री शशीकांत मोहिते’ सरांचा सेवानिवृत्ती समारंभ नुकताच संपन्न झाला. सरांचा सहवास मला पाचवीमध्ये लाभला. सरांनी मुला मुलींना विविध प्रकारच्या अनेक बैज दिल्यात. त्यापैकी मलाही ‘मॉनीटर बैज’ होता. वर्गाची जबाबदारीची कामे करतांना बार आनंदही झाला. आमची शाळा स्वच्छ आहे ते फक्त मोहिते सरांमुळेच, आमच्या शाळेला स्वच्छता अभियानाचा २ लाखाचा पुसकार प्राप्त झाला. ते ही फक्त मोहित संरांमुळेच, आमच्या शाळेत विविध सहशालेय नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. मोहिते सरांनी शाळेत विविध प्रकारचे बैज दिले आहे. मोहिते सरामुळेच मुला मुलींना विविध पद दिले आहे. जसे, Disepline moniter. cleanest moniter, moniter, assistance moniter, Happines minister, Prime minister, star writer, assembly moniter, bord moniter, english speaking moniter’ यासारखी पद मोहिते सरांनी दिल्या. आमच्या शाळेत विविध शैक्षणिक प्रदर्शन भरवले जातात. जसे, गणित प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन, मराठी भाषा चित्रे प्रदर्शन, इंग्रजी प्रदर्शन, असे विविध विषयाचे प्रदर्शन आमच्या शाळेत भरत होते तेही मोहित सरांमुळेच.

आमच्या शाळेत सांस्कृतिक विविध कार्यक्रम व्हायचे. मी सुद्धा कित्येकदा नृत्यात सहभागी झाली. जसे, नृत्य, भाषण आणि स्पर्धा देखील व्हायच्या जसे, गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा अशा व अनेक प्रकारच्या स्पर्धा व्हायच्या ते ही फक्त मोहिते सरांमुळेच त्यांच्या नियोजनात एक प्रकारचा आत्मविश्वास होता. म्हणून सर्व उपक्रम यशस्वी झालेत. आमच्या शाळेत पूर्ण एक दिवस मोहिते सरांनी ‘स्पोर्टस डे’ सुध्दा ठेवला होता. खूपच मज्जा आली. त्यात माझ्या टीमला खो-खो चे पहिले बक्षीसही प्राप्त झाले. आम्हाला काही अडचण असली तर आम्ही त्यांना विचारायचो आणि ते आम्हाला मार्गदर्शन करून योग्य उपाय देखील सांगायचे. मोहिते सरांचा काळ आतापर्यंतचा कार्यकाळ हा एक ‘आदर्श कार्यकाळ’ राहिला आहे. मोहिते सरांच्या पुढील निरोगी, आनंदी आणि सुखमय आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त करते. प्रेरणादायी व्यक्तीमत्व असलेल्या मोहिते सराना सेवापूर्तीच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!!!

कु.हर्षिता राहुल पाटील
वर्ग ५ वा, वर्गनायिका
नेहरू विद्यालय, हिंगणा जि.नागपूर

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे