0
4
8
2
9
7
मरताही येत नाही
जगायचं जरी आहे,जगताही येत नाही…
मरायचं जरी आहे,मरताही येत नाही…धृ
लादल्या आहे कित्येक,डोई त्या जबाबदारी…
पळायचे ठरवले,पळताही येत नाही…१
समजले ज्यांना देव,राक्षसाची वृत्ती त्यांची…
अडकलो कायमचं, सुटकाही होत नाही…२
वडील भाऊ असतो,ऐकलं देवासमान…
पण त्याच्या घातपाती,वाचताही येत नाही…३
आजपावेतो जपली, जपली भाऊबंदकी…
भावाच्या त्या वैरत्वाला,पेलताही येत नाही…४
जगतांना ठेवले मी,भावां नित्य काळजात…
कसे ठेचलेय त्यांनी, सांगताही येत नाही…५
आईसमान मानले, वहिनीला सदोदित…
तिने रंगविली गाथा,वदताही येत नाही…६
तुटलेले धागे बघा,वाटे आता तरी जोडू…
दोन पाऊल मी जातो,ते पुढेही येत नाही…७
काय करू काय नाही?, काही कळतंच नाही…
‘सुधाकरा’ फाटलेले,शिवताही येत नाही…८
सुधाकर भगवानजी भुरके
आर्य नगर, मानकापूर नागपूर
=================
0
4
8
2
9
7



